शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस कॉल’ सदस्यांचा भाजपाला विसर

By admin | Updated: April 19, 2016 04:30 IST

तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक

अनिकेत घमंडी, डोंबिवली (ठाणे) तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाचा फटका बसल्याने आता आपल्या सदस्यांची शोधाशोध पक्षाने सुरू केली आहे. ‘मिस कॉल’ देऊन पक्षसदस्य बनलेल्या बहुतांश मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचा विसर भाजपाला पडल्याने हे हवशे-गवशे कमळाला मत देण्याचे विसरून गेले, असे आता पक्षाच्या निदर्शनास आले आहे. या ‘मिस कॉल’ घोळाची मंगळवारी दिल्लीत झाडाझडती घेतली जाणार आहे. देशभरात नोव्हेंबरमध्ये महाजनसंपर्क अभियान राबवले गेले. त्याअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गावस्तरावर सदस्य नोंदणी करण्यात आली. मंत्री, नेते, उपनेते, पदाधिकारी आदींना सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिले होते. त्यामुळे भाजपाची मंडळी मिस कॉल देऊन सदस्य होण्याचा आग्रह धरीत होती. त्या लोकांना गाठून त्यांना पक्षकार्यात आणण्याची जबाबदारी मात्र विसरल्याचे काही निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. विशेषत: बिहार निकालानंतर ही बाब चर्चेत आली होती. मात्र, आता ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव पदरी आल्यावर या सदस्य नोंदणीचे बिंग फुटले.> 1 लाख लोक भाजपाचे सदस्य ठाणे जिल्ह्यातच मिस कॉल देऊन झाले. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी ९५ हजार व्यक्तींशी गेल्या वर्षभरात पक्षाचा संपर्क झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.> भाजपाने महाराष्ट्रात १ कोटी सदस्य संख्येचे लक्ष्य निश्चित केले होते व ते साध्य करण्यात यश मिळवले होते. नवीन सदस्यांसोबत वरचेवर संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरूच असते. सदस्य नोंदणीबाबत दिल्लीत बोलवलेल्या बैठकीसंबंधी आपल्याला काहीही भाष्य करायचे नाही. - रवींद्र भुसारी, संघटनमंत्री, प्रदेश भाजपा