शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या शहीद दिनाबाबत तरुणाईची दिशाभूल

By admin | Updated: March 23, 2016 02:14 IST

१४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना याच दिवशी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशी दिले गेले

ठाणे : १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना याच दिवशी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशी दिले गेले व आज ‘शहीद दिन’ असल्याचे संदेश व्हाटस्अ‍ॅपवर फिरवून दिशाभूल केली गेली. मात्र खराखुरा ‘शहीद दिन’ उद्या २३ मार्च रोजी असून सोशल मीडियांवरील अफवांची धूळवड आम्हा युवा पिढीची दिशाभूल करीत असल्याची खंत काही युवक-युवतींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.उद्या होळीखेरीज आणखी काय आहे, असा सवाल ‘लोकमत’च्या कॉलेज कट्टा वार्ताहरांनी युवांना केला. त्यावेळी फारच थोड्यांना ‘शहीद दिन’ असल्याचे सांगता आले. काहींच्या मनात ‘शहीद दिन’ १४ फेब्रुवारीस आहे की २३ मार्चला याबाबत संभ्रम होता. काहींनी ‘शहीद दिन’ हा १४ फेब्रुवारीसच आहे, असा छातीठोक दावाही केला.ज्यांनी उत्तर अचूक दिले ते म्हणाले की, व्हॉटसअ‍ॅपवर एखादा संदेश आल्यावर आम्ही त्याची खातरजमा करून पाहतो. त्याखेरीज तो फॉरवर्ड करीत नाही. स्मार्ट फोनमुळे हे सहज शक्य आहे. युवा पिढीला विकीपीडिया हे ज्ञानाचे भांडार वाटत असून व्हॉटसअ‍ॅपवरील माहिती हा खजिना ठरला आहे. फेसबुक हे मन मोकळे करण्याची ‘कन्फेशन बॉक्स’ वाटू लागली आहे. त्यामुळे बरेचदा कुठलीही खातरजमा न करता किंवा मूळ ग्रंथ किंवा कागदपत्रे न वाचता सरधोपट विधाने करणे किंवा व्यक्त होण्याचे प्रकार घडतात. स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आम्हाला अभिमान असल्याची भावना व्यक्त करतानाच भविष्यात केवळ व्हॉटसअ‍ॅपवर निर्भर राहणार नाही, असे युवक-युवतींनी मान्य केले. (कॉलेज कट्टा वार्ताहर)भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना २३ मार्च रोजी फाशी देण्यात आली होती. त्यामुळे तोच दिवस ‘शहीद दिन’ आहे हे माहित होते. मात्र १४ फेब्रुवारीला ‘शहीद दिन’ असल्याचे सांगून सोशल मीडियावर चुकीची माहिती फिरवली जात होती. - योगेश विसपुतेजुन्या पिढीला वाटतं की युवा पिढी शहीदांना विसरली आहे, परंतु तसे नसून, त्यांचे विचार समाजात रुजवण्याचे काम युवकच करतो आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देहाने जरी आमच्यात नसले तरी त्यांच्या बलिदानाची जाणीव आम्हाला आहे. मात्र शहीद दिनाबाबत संभ्रम निर्माण केला गेला हे खरे- नितेश गावकर१४ फेब्रुवारीला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी दिल्याचा मेसेज मी वाचला होता. मात्र तो कोणाला फॉरवर्ड केला नाही. कारण त्याबाबत साशंक होतो. कॅलेण्डरमध्ये २३ मार्चला ‘शहीद दिन’ असल्याची नोंद आहे, पण त्याकडे आमचे लक्षच गेले नाही. त्यादिवशी फक्त होळी आहे इतकेच माहित होते. - आकाश शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय१४ फेब्रुवारीलाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली या मेसेजवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा मेसेज मी फेसबुकवर शेअर केला होता. एकीकडे हा‘ शहीददिन’ असताना भारतात व्हॅलेण्टाईन डे साजरा केला जातो, याची खंत मला नेहमीच आहे. २३ मार्च रोजी तीन क्रांतीकारकांना फाशी दिले याबाबत मी अनभिज्ञ आहे. उद्या केवळ होळी असल्याची माहिती आहे. - रेमोना क्रास्तो, ज्ञानसाधना महाविद्यालय