शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: December 28, 2015 04:07 IST

राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे़

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे़ ही जनतेची दिशाभूल असल्याचे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपूरमध्ये प्रारंभ झाला़ आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत? भाजपा व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करून जनतेला फसवत आहेत़ किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये़ जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कायमचे हद्दपार करावे़ मागच्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे़ भाजपा-सेनेच्या काळात लोकांना पिण्यास पाणी मिळत नाही़ वाईनचा मात्र जागोजागी महापूर दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)