शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटरी नॅपकिनबाबत सरकारकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:26 IST

किमती कमी होणे शक्य नाही; जीएसटीचा परतावा मिळणार नाही

नागपूर : सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवरील १२ टक्के जीएसटी रद्द केला असला तरी च्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याच्या नावाखाली केद्र सरकारने निव्वळ दिशाभूल केली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.जीएसटी रद्द झाल्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादक कंपन्यांना आता कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळणार नाही व परिणामी किमती जवळपास त्याच राहतील, असे ओमेक एन्टरप्राईजेसमधील सूत्रांनी सांगितले.एका नॅपकिनची उत्पादन किंमत साधारणत: २.२५ रुपये असते व त्यावर कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीचे ३० पैसे उत्पादकाला परत मिळतात. एकाची विक्री किंमत साधारणत: ३.१० रुपये असते. जीएसटी रद्द झाल्यानंतर उत्पादन किंमत २.२५ रुपयेच राहील पण कर परतावा मिळणार नाही, या क्षेत्रात तीव्र स्पर्धा असल्याने विक्री किंमत ३.१० रुपयेच राहील असे या सूत्रांचे म्हणणे आहे.४५०० कोटींची उलाढालभारतात दरवर्षी ४५०० कोटी रुपयांचे सॅनिटरी नॅपकिन्स विकले जातात. बहुतांश बाजारपेठेवर बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व आहे, या कंपन्या लघु उद्योगाकडून हे पॅड्स बनवून घेऊन स्वत:च्या ब्रँडने विकतात. त्यामुळे ब्रँड नेमवर लागणारा १८ टक्के जीएसटी या कंपन्यांना भरावा लागतो. यामुळेही किमती कमी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GSTजीएसटी