शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अल्पसंख्यांकांमध्ये घबराट !

By admin | Updated: July 4, 2015 03:00 IST

मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे सांगत सरकारचा हा निर्णय अल्पसंख्यांक समाजात

मुंबई : मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे सांगत सरकारचा हा निर्णय अल्पसंख्यांक समाजात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा घेतलेला निर्णय हा केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या धोरणाला छेद देणारा आहे. मुस्लिम समाजातील केवळ ४ टक्के मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण म्हणाले. भाजपा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मदरशांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची खळबळ माजविण्याची ही भाजपाची जुनी नीती असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १०५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. येत्या ९ व १० जुलै रोजी संपूर्ण राज्यात मोर्चे, निदशर्ने, धरणे आदींच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतरही सरकारने कजर्माफी न दिल्यास विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटताना दिसतील, असा इशारा चव्हाण यांनी दिला.कजर्मुक्ती आंदोलनाची जिल्हानिहाय जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे व सातारा जिल्ह्यातील आंदोलनांचे नेतृत्व करणार असून, नारायण राणे सिंधुदूर्ग व रत्नागिरीतील आंदोलनांची धुरा सांभाळतील. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलनाचे नेतृत्व करतील. या व्यतिरिक्त आ. पतंगराव कदम (सांगली व कोल्हापूर), आ.बाळासाहेब थोरात (नाशिक), आ. माणिकराव ठाकरे (वाशिम व अकोला), रोहिदास पाटील (धुळे व जळगाव), खा. राजीव सातव (हिंगोली), आ. विजय वडेट्टीवार (चंद्रपूर), हर्षवर्धन पाटील (सोलापूर), रविशेठ पाटील (रायगड), आ. नसीम खान (ठाणे), आ. डी.पी. सावंत (नांदेड व परभणी), आ. रणजित कांबळे (वर्धा), आ. अब्दुल सत्तार (जालना), आ. अमित देशमुख (लातूर व बीड), आ. मधुकरराव चव्हाण (उस्मानाबाद), आ. गोपालदास अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र गावीत (पालघर), पद्माकर वळवी (नंदूरबार), शिवाजीराव मोघे (बुलडाणा व यवतमाळ), वसंत पुरके (अमरावती), नितीन राऊत (नागपूर व भंडारा), नामदेव उसेंडी (गडचिरोली) आदी नेतेही या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.