शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक आयोगाला हवे स्वतंत्र संचालनालय

By admin | Updated: January 22, 2016 03:34 IST

राज्यातील अल्पसंख्याक आयोगाने अल्पसंख्याक विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापनेची मागणी केली आहे

जमीर काझी,  मुंबईराज्यातील अल्पसंख्याक आयोगाने अल्पसंख्याक विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापनेची मागणी केली आहे. आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. या मागणीसाठी राज्य सरकारकडे सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला जाईल, असे आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र विद्यापीठ, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि अन्य राज्यांप्रमाणे या विभागासाठी एक हजार कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आग्रही राहण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. बैठकीला शासनातील विविध विभागातील २२हून अधिक वरिष्ठ आजी-माजी अधिकारी उपस्थित होते. आयोगाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा व तालुकास्तरावर जागृती मेळावा घेण्याचे या वेळी ठरले.राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जवळचे कार्यकर्ते व जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी मोहम्मद हुसेन खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. खान यांनी मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, पारशी, शीख व बौद्ध धर्मियांच्या विविध प्रश्नांसाठी व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या हेतूने विविध क्षेत्रातील नामवंतांची निमंत्रित म्हणून तज्ज्ञ समितीत निवड केली आहे. या समितीची आयोगाचे सचिव हुसेन मुजावर यांनी गुरुवारी पहिली बैठक बोलावली होती. दिवसभर चाललेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक अल्पसंख्य समाज दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) असल्याचे शासनाच्या आकडेवारीतून आधीच स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी हवी तशी होत नाही. केरळ, पंजाब, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात अल्पसंख्याक विकास विभागासाठी १ हजार कोटींची तरतूद असते. महाराष्ट्रात मात्र ही तरतूद ३५० कोटी आहे. वर्षाला त्यातील निम्माही निधी खर्च होच नाही. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी, शासकीय-निमशासकीय भरतीवेळी निवड मंडळामध्ये समाजाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, याच्या अंमलबजावणीसाठी मागासवर्गीय व अन्य जातीप्रमाणे स्वतंत्र अल्पसंख्याक विकास संचालनालय स्थापन होणे गरजेचे असल्याने तसा ठरावच बैठकीत एकमताने करण्यात आला.