शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन असुरक्षितच!

By admin | Updated: April 29, 2016 03:07 IST

नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई : नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतून दिवसाला २ ते ३ मुले बेपत्ता होत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर तब्बल १३० मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कामाच्या वाढत्या ताणामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. सध्या शाळेला सुटी लागल्याने लहान मुले अधिकाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पाल्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर इतरांना दोष देण्यापेक्षा आपली मुले कोणाबरोबर, किती वेळ आणि काय खेळतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.शहरातून दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होत आहेत. यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पैकी अवघ्या १५४ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यापैकी १२० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यांत २३८ मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर १२१ मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. (प्रतिनिधी)>प्रमाण अधिक असलेले परिसरभांडुप, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागांत बालकांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता होण्यामागची कारणे१४ ते १८ वर्षे वयोगटातील काही मुले आपल्या मर्जीने घर सोडतात, तर काही प्रेमप्रकरणामुळे पळून जातात. काही मुलांचे खंडणीसाठी अपहरण होते. जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषणासाठीही अपहरण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैध विक्रीसाठी, परदेशात पाठवण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या चिमुरड्यांचे अपहरण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.