देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : प्रेमाची झिंग चढलेले अन् तीन दिवसांपूर्वी पलायन केलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाला अखेर पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे ताब्यात घेतले. सैराट चित्रपटाप्रमाणे हे प्रेमीयुगुल पळाले होते. देऊळगाव मही या गावात दहावी झालेल्या मुलाचे सध्या दहावीत शिकत असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून मग आयुष्यभर सोबतच जगण्याच्या आणाभाका दोघांनी घेतल्या; मात्र प्रेमाला घरातून विरोध होईल, याची त्यांना भीती होती. कुटुंबीयांना काही कळण्यापूर्वीच दोघांनीही मनाचा ठाम निश्चय करुन घरातून पलायन केले. २० मे रोजी एका मित्राच्या मदतीने ते औरंगाबादपर्यंत पोहोचले. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. हे प्रेमीयुगुल पुण्यावरून रायगड जिल्ह्यात पनवेलकडे रवाना झाले. पनवेल येथील एका अनोळखी इसमाने त्यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी खोली दिली. तोपर्यंत पोलिसांचे पथक पनवेल येथे पोहोचले. त्यांनी प्रेमीयुगुलाला ताब्यात घेऊन सोमवारी देऊळगावराजा येथे आणले. (प्रतिनिधी)वेगळे होण्यास नकारपोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी वेगळे होण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांचेही नातेवाईक पोलीस स्टेशनमधून परत गेले. दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना बुलडाणा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती तपास अधिकारी सांगळे यांनी दिली.
अल्पवयीन प्रेमीयुगुलांना घेतले ताब्यात!
By admin | Updated: May 25, 2016 02:01 IST