शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

By admin | Updated: July 8, 2017 06:23 IST

फिरायला नेण्याच्या बहाण्याने वडिलांच्या मित्रांसह चार जणांनी एका १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल २४ तास सामूहिक लैंगिक अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वडिलांच्या मित्रांसह चार जणांनी एका १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल २४ तास सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली. मुलीचे ट्रॉम्बे परिसरातून अपहरण झाले असल्याने या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत मित्र आनंद कर्नपात्रे (३८) याच्यासह साई कृष्ण भट्टी (१९), कार्तिक तेवर (२०) या तिघांना बेड्या ठोकत चौथा आरोपी भरत ओव्हाळचा शोध पोलीस घेत आहेत.मानखुर्द परिसरातील १५ वर्षांची मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. तिचे वडील गारमेंटमध्ये काम करतात. आरोपी आनंदही गारमेंटमध्ये काम करत असून, तिच्या वडिलांचा मित्र आहे. बुधवारी दुपारी २ वाजता आनंदने मुलीला सोबत फिरायला नेतो असे तिच्या वडिलांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्याला परवानगी दिली. दुपारी अडीच वाजता मुलीला घेऊन तो रिक्षाने भांडुपमधील साईच्या घरी आला. मुलीला खोलीत डांबून त्याने त्याचे अन्य दोन मित्र कार्तिक आणि भरतलाही बोलावून घेतले. चौघांनीही नशा केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केले. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी आनंदला फोन केला असता त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी रात्री उशिराने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरू होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता तिला याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत आरोपींनी भांडुप येथील महाराष्ट्रनगर येथे सोडले.