शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: November 5, 2016 01:07 IST

खेड तालुक्यातील पोलीस पाटील असलेल्या आरोपीने एका अल्पवयीन पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा उघडकीस आला

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पोलीस पाटील असलेल्या आरोपीने एका अल्पवयीन पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. पीडित मुलीने त्याच्याविरोधात आज खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजळे गावाचा पोलीस पाटील असलेला आरोपी गंगाराम नामदेव खंडे ( वय ४६, रा. वांजळे, ता.खेड) हा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने १४ सप्टेबर रोजी दुपारी, इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींना वांजळे येथील आपल्या राहत्या घरासमोर त्या खेळत असताना, चॉकलेट देतो असे सांगून घरात बोलावुन घेतले होते. त्यानंतर त्याने घराला आतुन कडी लावली आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले होते. त्यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर पोलिसांनी भा.द.वि. कलम ३५४(अ) (१) नुसार आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात आरोपी २४ आॅक्टोबर सत्र न्यायालयात शरण गेला. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. या पीडित मुलीचे मूळ गाव भिवेगाव ( ता- खेड ) हे आहे. तिची आई राजगुरूनागरला कामानिमित्त राहते. तसेच ती मुलगीही काही दिवसांपासून राजगुरूनगरला वसतिगृहात राहत होती. सुट्टीत तिची आई आणि हि मुलगी भिवेगाव येथे राहण्यास आल्या. त्त्या मुलीने ती वांजळे येथे राहत असताना २०१४ सालापासून आरोपी गंगाराम खंडे हा तिला बेशद्ध करून दोन वर्षे वारंवार अत्याचार करीत होता. ही गोष्ट मुलीने सांगितले. आईने फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फियार्दीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरिक्षक चेतन माने अधिक तपास करीत आहेत.