शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, कराटे प्रशिक्षकाला अटक

By admin | Updated: July 7, 2017 19:00 IST

एखाद्याने हल्ला केला तर तो स्वसंरक्षणासाठी कसा परतवून लावायचा, त्यांच्यावर कसा हल्ला करायचा यासाठी कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकानेच

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 07 - एखाद्याने हल्ला केला तर तो स्वसंरक्षणासाठी कसा परतवून लावायचा, त्यांच्यावर कसा हल्ला करायचा यासाठी कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकानेच विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडी भागात घडला. या मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सर्वजीत सिंग हा या १३ वर्षीय पिडीत मुलीसह वृंदावन सोसायटीतील १५ ते २० मुलांना कराटेचे प्रशिक्षण देतो. मे २०१५ पासून तो तिला कराटेचे प्रशिक्षण देत होता. तेंव्हापासूनच त्याने अनेकदा तिचा विनयभंग केला. परंतु, कराटे प्रशिक्षणाचाच एक भाग समजून तिने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. तिने याबाबत तिच्या आईकडे तक्रार केल्यानंतर त्याने कराटेचे स्वसंरक्षणासाठी हल्ली कसे महत्त्व आहे, हे त्यांनाही पटवून दिले. त्यामुळे तिच्या आईच्या आग्रहाखातर तिला पुन्हा या क्लासला जावे लागले. त्यानंतर तो तिला क्लास संपल्यानंतर घरी येऊन हॉलमध्ये जादा प्रशिक्षण देऊ लागला. पण, त्याच्या या हरकती वाढतच गेल्या. पुढे त्याने तिला धमकावून तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर त्याच्या मोबाईलवर मागविले. आता हे फोटो इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी चाळे सुरुच ठेवले. अखेर आपल्याला क्लासला जायचेच नसल्याचे तिने आईला पुन्हा ठामपणे सांगितले. आईने तिला याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. अखेर तिने हा क्लास बंद केला. त्यावर संतापलेल्या सर्वजीतने क्लास बंद केला तर ते फोटो व्हायरल करण्याची पुन्हा आईलाही धमकी दिली. कहर म्हणजे त्या मुलीच्या आईशीही त्याने तसेच चाळे करण्याचा प्रयत्न केला. अखेर या संपूर्ण प्रकाराला कंटाळून या मायलेकींनी धाडस करुन ६ जुलै २०१७ रोजी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी विनयभंगासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ ब चे ब आणि क आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल केला. सर्वजीत याला तत्काळ अटक केली असून ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे.