शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 02:17 IST

अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत, तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चारकोप परिसरात घडली.

मुंबई : दुकानात भाजी खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत, तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चारकोप परिसरात घडली. मुलीच्या पोटात दुखत असल्याने, तिला कुपर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा दीड महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली असून, ती चार आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सोमवारी चारकोप पोलिसांनी पॉक्सो आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.चारकोपर परिसरात १४ वर्षांची नेहा आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी तिच्या पोटात दुखत असल्याने, आईने तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. तेथील डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्यासाठी कुपर रुग्णालयात धाडले, तेव्हा नेहा चार आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आल्याने कुटुंबीयांनाही धक्का बसला. रुग्णालयाने ही माहिती चारकोप पोलिसांना दिली. त्यानुसार, चारकोप पोलिसांनी नेहाचे घर गाठले. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. नेहाने दिलेल्या जबाबानुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सायंकाळी ७च्या सुमारास आईने तिला भाजी आणण्यासाठी बाहेर पाठविले. भाजी खरेदीसाठी ती नेहमीच्या रस्त्याने निघाली. त्याच दरम्यान अंधाराचा फायदा घेत, दोन तरुणांनी नेहाला गुंगी आणणारा वास देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर, जवळच्या झुडपात नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे नेहा प्रचंड घाबरली होती. शुद्धीवर आल्यानंतर नेहाने घर गाठले, परंतु घडलेल्या प्रकाराबाबत तिने कोणालाही सांगितले नाही.अखेर दीड महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सोमवारी चारकोप पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध पॉक्सो आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत, तसेच अभिलेखावरील आरोपी, रोडरोमियो, गर्दुल्ले यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीपी श्रीरंग नाडगौडा यांनी दिली. (प्रतिनिधी)।चिमुरड्यांचा आक्रोश थांबणार कधी?२० मार्च ते २६ मार्च या आठवड्यात तब्बल १० लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे, तर ३०२ मुलींचे अपहरण झाले असून, त्यापैकी १४६ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांच्या तुलनेत हा आकडा वाढलेला आहे. दिवसेंदिवस चिमुरड्यांवरील अत्याचारांचा आकडा वाढत आहेत. 83मुली गेल्या तीन महिन्यांत लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या आहेत. यापैकी ७४ गुन्ह्यांची उकल झाली.