शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 07:45 IST

पार्टी करण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय मुलीला एका दुकानात नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री चेंबूर येथे घडली

मुंबई : पार्टी करण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय मुलीला एका दुकानात नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री चेंबूर येथे घडली. टिळक नगर पोलिसांना याची माहिती मिळताच रात्री ३ वाजता छापा घालून पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ अटक केली आहे. पीडित मुलीवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. या परिसरात आरोपीदेखील राहत असून यातील दोन आरोपींसोबत या मुलीची अनेक दिवसांपासून मैत्री होती. मंगळवारी या सहाही आरोपींनी पार्टी करण्याचा बेत आखला. त्यानुसार त्यांनी या मुलीलादेखील पार्टीत सामील होण्यास सांगितले. मुलीने होकार देताच, या आरोपींनी अमर महल परिसरातील पेस्तम सागर येथे असलेल्या एका दुकानात पार्टी करण्याचे ठरवले. एका मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम असल्याचे कारण आई-वडिलांना सांगून ही मुलगी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली. त्यानंतर दोन मित्रांनी तिला पेस्तम सागर परिसरातील दुकानात नेले.या ठिकाणी अगोदरच आणखी चौघे पार्टी करण्याच्या तयारीत होते. काही वेळातच तिघेही दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनीही पार्टीला सुरुवात केली. त्यानंतर या आरोपींनी मुलीलादेखील मोठ्या प्रमाणात दारू पाजली. काही वेळातच मुलगी पूर्णपणे नशेत धुंद झाली. ही संधी साधत सहा आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींचे हे कृत्य मध्यरात्री ३ वाजेपर्यंत सुरू होते. या वेळी एका रिक्षाचालकाची नजर या आरोपींवर पडली. दुकानाचे शटर उघडताना त्याने मुलीला आणि या आरोपींना एकत्र पाहिले. तेव्हा टिळक नगर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या ठिकाणी रात्रीची गस्त घालत होते. रिक्षाचालकाने तत्काळ या पोलिसांना थांबवून दुकानात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तत्काळ आणखी काही पोलिसांना बोलावून दुकानाबाहेर सापळा रचला. त्यानंतर पवन पगारे (२१), सिद्धार्थ शिलवन (२१), किरण निकाळजे (२३), विकास घेवाळ (२१), रवी पुमाले (२५) आणि सचिन सुकाळे (२३) या सहा आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. या वेळी पीडित मुलीसह सर्व जण नशेत धुंद होते. त्यानुसार आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या पीडित मुलीला पोलिसांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या सहाही आरोपींवर पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.