शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाची प्रेमसंबंधातून हत्या

By admin | Updated: July 21, 2016 05:42 IST

बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाला

नवी मुंबई : बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेरूळमध्ये घडली आहे. स्वप्निल सोनावणे (१५) असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र परशुराम नाईक (५०), मालती राजेंद्र नाईक (४५), सागर राजेंद्र नाईक (२५), साजेश राजेंद्र नाईक (२१), आशीष बाबूराव ठाकूर (२३), दुर्गेश विलास पाटील (२२), समीर मुजीबत शेख (२३) यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, हत्या, अपहरण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नेरूळ सेक्टर १३ मधील एसबीआय वसाहतीत राहणाऱ्या स्वप्निल याचे दारावे गावातील एका १४ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होते व ते नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीचा भाऊ सागर राजेंद्र नाईक (२५) याला मिळाली होती. सोमवारी रात्री त्याने मित्रांच्या मदतीने स्वप्निलला वसाहतीबाहेर बोलावले आणि रिक्षातून दूर नेऊन धमकावले होते.पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांनी घरी येऊन स्वप्निल व त्याच्या लहान बहिणीला धमकावले. हे कळताच स्वप्निलचे वडील घरी आले असता, त्याठिकाणी सागर हा त्याच्या साथीदारांसह होता. त्याने आधी स्वप्निलच्या संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या छतावर नेऊन खाली टाकण्याची धमकी दिली. नंतर ‘घरी येऊन आई-वडिलांची माफी मागितली, तरच तुमची सुटका होईल,’ असे धमकावले आणि त्यांना बळजबरीने दारावे गाव येथे घेऊन गेला.त्याच्या घराजवळ आधीच २५ ते ३० जणांचा जमाव जमलेला होता. तेथे गेल्यावर सागरने स्वप्निलला मारहाण केली. भीतिपोटी स्वप्निल व त्याचे आई-वडील पळू लागले असता, जमावाने पाठलाग करून तिघांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत स्वप्निलच्या डोक्याला व छातीवर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)>पोलिसांकडून दुर्लक्ष सागरने धमकावल्याची तक्रार घेऊन नेरूळ पोलीस ठाण्यात गेलो असता, पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू यांनी, तुम्हाला ‘सैराट’ करायचे आहे का, अशी भीती दाखवत तक्रार न घेता परत पाठवले, असे सांगत स्वप्निलचे वडील शहाजी सोनावणे यांनी पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे.दोघा पोलिसांचे निलंबन स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या आरोपांची दखल घेत, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू व योगेश माने यांना निलंबित केले आहे.