शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील नगररचनाकाराला चौकडीने घातला २३ लाखांचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:29 IST

बदलीच्या नावाखाली फसवणूक : विमानतळालगतच्या जमिनीचे मिळकत प्रमाणपत्र देण्याचाही रचला बहाणा

ठाणे : केंद्रीय मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून मंत्रालयातून अंबरनाथ येथे बदली करण्याकरिता आणि मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाला लागून असलेली जमीन मिळकत डेव्हलप करण्याकरिता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचा नाहरकत दाखला (एनओसी) मिळवण्याचे आमिष दाखवून मंत्रालयातील नगरविकास विभागाचे नगररचनाकार विद्यासागर चव्हाण (५४) यांना एका चौकडीने २३ लाखांचा गंडा घातल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी रामचरण गोहर ऊर्फ बाबाजी, धर्मेंद्र सिंग, मेहबूब शेख, मोहन झा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

ठाण्यातील बाळकुम येथील रहिवासी असलेल्या चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंत्रालयात नगरविकास विभागात नगररचनाकार म्हणून नोकरी करत असताना दोन वर्षांपूर्वी ते खाजगी कामानिमित्त मीरा-भार्इंदर येथे गेले होते. तेथे त्यांची रणजित रामचरण गोहर ऊर्फ बाबाजी याच्याशी ओळख झाली. केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी धर्मेंद्र सिंग, तसेच मुंबई व दिल्ली मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांबरोबर जवळचे संबंध असल्यामुळे बदल्यांची कामे करत असल्याची बतावणी बाबाजीने केली होती. तुमचे बदलीबाबत किंवा इतर कोणतेही काम असल्यास सांगा, मी १०० टक्के करून देईल, असे बाबाजीने त्यांना आमिष दाखवले.

त्याचदरम्यान २०१७ मध्ये सिंग हे मुंबई येथे आले, तेव्हा बाबाजीने अंधेरीतील एका हॉटेलमध्ये ओळख करून दिली. त्यानंतर, सिंग हे पुन्हा मुंबईत आल्यावर त्यांनी फोन करून मंत्रालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी मंत्रालयातील सेक्रेटरी नितीन करीर यांना २८ लाखांचे घड्याळ भेट द्यायचे आहे. तुमची बदली मी करून देतो, त्याअगोदर तुम्ही मला घड्याळ घेण्यासाठी पैसे द्या, असे सांगितले. त्यानंतर, १८ लाख देण्याचे ठरले. ते पैसे सिंग यांचा मित्र आय.जी. पटेल याच्या गुजरात येथील दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवण्याबाबत सांगितले. त्यानुसार, त्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर, डिसेंबर महिन्यात पुन्हा सिंग मुंबईत आल्यावर उर्वरित सहा लाखांची मागणी केल्यावर ती रक्कम बाबाजी याच्याकडे कापूरबावडीनाका येथे रोख स्वरूपात दिली. ११ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रालयातील बदल्या झाल्या. मात्र, त्यात अंबरनाथ येथे दुसºया एका अधिकाºयाची बदली झाल्याने सिंग यांना विचारणा करून तुम्ही माझे पैसे मला परत द्या, तेव्हा सिंग याने ते खर्च झाले आहेत, तुम्ही दुसरे काही काम असेल तर सांगा, असे सांगून फसवणूक केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.आणखी १२ लाख उकळलेचव्हाण यांनी त्यांचा मित्र शाह यांच्या आईच्या नावे आंतरराष्टÑीय विमानतळाला लागून जमीन आहे. ती मिळकत डेव्हलप करण्याकरिता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या एनओसीची गरज आहे. ती मिळवून द्या, असे सांगितले. त्यावेळी सिंग यांनी ते काम मोठे आहे. त्यासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार त्या कामासाठी मेहबूब शेख आणि मोहन झा यांना १२ लाख रुपये दिले. त्यानंतर, मोहन झा यांनी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचा बनावट ई-मेल आयडी व बोगस एनओसीचे पेपर्स बनवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.