शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मंत्रालय नूतनीकरण खर्चात भरमसाठ वाढ !

By admin | Updated: November 20, 2014 04:42 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारला नवीन वर्षापासून नूतनीकरण झालेल्या मंत्रालयातून काम सुरू करणे शक्य होणार नाही़ कारण नूतनीकरणाचा आतापर्यंतचा खर्च १६२ कोटींच्या पुढे गेला

संदिप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपाप्रणीत सरकारला नवीन वर्षापासून नूतनीकरण झालेल्या मंत्रालयातून काम सुरू करणे शक्य होणार नाही़ कारण नूतनीकरणाचा आतापर्यंतचा खर्च १६२ कोटींच्या पुढे गेला असून, हे काम करणारी युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.मंत्रालयाला आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पुनर्बांधणीऐवजी नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या कामाकरिता एल अँड टी, शापूरजी पालनजी आणि युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी निविदा दाखल केल्या होत्या. एल अँड टीची निविदा १७६ कोटी रुपयांची, शापूरजीची निविदा १६६ कोटी रुपयांची तर युनिटीची निविदा १६२ कोटी रुपयांची होती. या सर्व निविदा जास्त रकमेच्या वाटल्याने सरकारने त्या रद्द करून फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी युनिटी कंपनीने हेच काम १३९ कोटी रुपयांत करून देण्याची तयारी दाखवल्याने त्यांना हे काम डिसेंबर २०१२ मध्ये दिले गेले. १० महिन्यांत त्यांनी हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आता याच कामावरील खर्च त्यांच्या मूळ निविदा रकमेच्या म्हणजे १६२ कोटी रुपयांच्या पुढे गेला असल्याचे युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन किशोर अवर्सेकर यांनीच ‘लोकमत’ला सांगितले.अवर्सेकर म्हणाले की, सरकारने कामात वारंवार आपल्या मर्जीनुसार बदल केले. मुख्यमंत्र्यांचे दालन पहिल्या मजल्यावर हवे की सहाव्या मजल्यावर याचा निर्णय करण्यात घोळ घातला. अधिकाऱ्यांना दालने करून देण्याकरिता फेरफार केले गेले. सातवा मजला करारात समाविष्ट नव्हता. काही मंत्री व अधिकाऱ्यांनी त्यांची दालने सोडली नाहीत. बांधकामाकरिता सर्व साहित्य विदेशातून आयात केले आहे. कामाला विलंब झाल्याने डॉलरचा विनिमय दर, कामगारांचा खर्च, कंत्राटदाराची देणी यावरील खर्चात वाढ झाली. सरकारकडून कामाची बिले नियमित मंजूर झाली तरच काम करणे शक्य आहे. ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे बंधन पाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे न झाल्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ अटळ आहे.राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनिटी कंपनीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने मंत्रालय नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याचे कारण पुढे केले आहे. कामाचे स्वरूप बदलले व काही मंत्री, अधिकाऱ्यांनी दालने रिकामी करून दिली नाही, हे खरे असले तरी कंपनीकडून वाढीव खर्चाचे केले जाणारे दावे आणि मुदतवाढीची केली जाणारी मागणी पटणारी नाही. सध्या मंत्रालयाबाहेर वेगवेगळी खाती हलवली आहेत़ त्या जागा सोडण्याची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. त्यामुळे आता मुदतवाढ देणे अशक्य आहे.