शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेनकोट खरेदीवर उत्तर देताना मंत्र्यांची दमछाक

By admin | Updated: July 21, 2016 04:30 IST

राज्यातील आश्रमशाळंमधील आदिवासी मुलांसाठी रेनकोट खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला,

अतुल कुलकर्णी,

मुंबई- राज्यातील आश्रमशाळंमधील आदिवासी मुलांसाठी रेनकोट खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, या प्रकरणाची चौकशी एसआयटी किंवा एसीबीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानसभेत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना चांगलेच अडचणीत आणले. रेनकोट खरेदीची आदिवासी विभागातर्फे चौकशी सुरु आहे, पण ती मान्य नसेल तर उद्योग विभागातर्फे चौकशी करु, असे उत्तर सावरा यांनी दिले. पण त्याने समाधान न झालेल्या सदस्यांनी सावरा यांना चांगलेच अडचणीत आणले. तालिका अध्यक्ष असलम शेख विरोधी बाकावरील सदस्यांना प्रश्न विचारण्याची संधी देत होते. जवळपास अर्धा तास प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झडत होत्या. शेवटी भाजपा सदस्य योगेश सागर तालिका अध्यक्ष म्हणून आले आणि त्यांनी या लक्षवेधीवरील चर्चा संपविण्याचा प्रयत्न केला. खात्यातर्फे चौकशी सुरु आहे, असे सावरा यांनी सांगितले. >रेनकोट खरेदीची निविदा : रेनकोट खरेदीची निविदा काढण्याचे, त्याच्या खरेदीचा प्रस्ताव बनविण्याचे, नंतर वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकरणाला स्थगिती देण्याचे आणि नंतर सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम एकच आयुक्त कसे काय करु शकतात? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांनी केला. मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सावरा देऊ शकले नाहीत. सावरा यांच्या मदतीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आले पण सावरा यांना उत्तरे देता आली नाहीत.