शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री नावाला; अधिकार कॅबिनेटकडे! 'खात्यात काय चाललंय कळेना', बोलून दाखविली व्यथा

By दीपक भातुसे | Updated: June 6, 2025 13:03 IST

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री असून ते सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याने नाराज असलेले राज्यमंत्री आपल्या खातात काय चालले आहे यापासूनही अनभिज्ञ आहेत. काही कॅबिनेटमंत्र्यांनी तर संपूर्ण खात्याचा कारभार आपल्याच हाती ठेवल्याची राज्यमंत्र्यांची तक्रार आहे.

आपल्या विभागातील धोरणात्मक बाबी, मंत्रिमंडळात निर्णयासाठी जाणारे प्रस्ताव, वित्त विभागाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव, विधि व न्याय विभागाला सादर होणारे प्रस्ताव, विभागाकडे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे ही राज्यमंत्र्यांकडून कॅबिनेटमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित असते.  सध्या अशी प्रकरणे बहुतांश विभागात थेट कॅबिनेट मंत्र्यांकडे जात असल्याने राज्यमंत्री खात्यामध्ये काय सुरू आहे याबाबत अनभिज्ञता पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयासह बोटावर मोजण्याइतके कॅबिनेटमंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत सकारात्मक आहेत. मात्र, अधिकारवाटपाची तुलना २०१४ ते २०१९ च्या काळातील अधिकारांशी केली जात आहे. 

सोयीसाठी राज्यमंत्रिपद?

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री आहेत. हे सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत. मात्र मागील सहा महिन्यांचा अनुभव लक्षात घेता आम्हाला केवळ राजकीय सोय म्हणून मंत्री करण्यात आले आहे का? अशी या राज्यमंत्र्यांची भावना आहे. अधिकार नसताना नावाला मंत्रिपद भूषवायचे का? असा सवालही ते खासगीत विचारत आहेत.

महामंडळाकडूनही दुजाभाव

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना २०१४ पर्यंत राज्यमंत्र्यांना त्यांच्या विभागाचा विषय असेल तर मंत्रिमंडळ बैठकीला बोलावले जायचे, मात्र सध्या राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याचा विषय असला तरी बैठकीला बोलवले जात नाही. राज्यातील काही महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री आहेत. पण महामंडळाचे अधिकारी राज्यमंत्र्यांना कोणतीही माहिती पाठवत नाहीत, बैठकांचे निमंत्रण दिले जात नाही, महामंडळाचे कामकाजाचे इतिवृत्त पाठविले जात नाही. महामंडळे थेट कॅबिनेट मंत्र्यांशी संबंध ठेवतात, अशी गंभीर तक्रारही राज्यमंत्र्यांंनी बोलून दाखविली. निधीवाटपातही आमचे मत विचारात घेतले जात नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अधिकारांचे वाटप करा

२०१६ आणि २०१९ ला राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत जे आदेश निघाले होते, किमान तेवढे अधिकार मिळावेत अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याने अगदी किरकोळ अधिकार राज्यमंत्र्यांना दिले, मात्र संबंधित राज्यमंत्र्यांनी आपल्याला हे अधिकारही नको असे संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना कळवले. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. २०१६ ते २०१९ या काळात राज्यमंत्र्यांना दिलेले अधिकार खूप कमी होते, त्यामुळे नव्याने विषयनिहाय फेरआढावा घेऊन अधिकार वाटप करावे, अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्री