शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळांचे गाजर!

By admin | Updated: May 10, 2015 03:47 IST

सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच

मुंबई : सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यावर येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळाल्यावर मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळे दिली जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे दोन तास बैठक झाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याकरिता भाजपाला साथ देताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना सत्तेत वाटा देण्याची आश्वासने दिली होती. सहा महिने उलटले तरी त्यापैकी कुठलेच आश्वासन पूर्ण केलेले नाही याबद्दल तीव्र चीड घटकपक्षांनी व्यक्त केली. आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशाच नेत्याची आता आम्ही भेट घेऊ, अशी राणाभीमदेवी थाटाची घोषणा या नेत्यांनी केली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांच्या कानी घातली. यावर मुख्यमंत्री फडणवीस बैठकीत म्हणाले की, केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळताच मित्रपक्षांना जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल. (विशेष प्रतिनिधी)