शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीवर मंत्र्याचा बहिष्कार

By admin | Updated: June 24, 2015 04:50 IST

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि वाट्याला आलेली दुय्यम खाती, यामुळे शिवसेनेत नाराजी धुमसत असून

यदु जोशी, मुंबई - शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि वाट्याला आलेली दुय्यम खाती, यामुळे शिवसेनेत नाराजी धुमसत असून सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकांवर काही दिवसांपासून बहिष्कार टाकून नाराजीला तोंड फोडले आहे. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आणि मंत्री असलेले शिंदे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ बैठकीला सतत दांडी मारत आहेत. आजही ते उपस्थित नव्हते. बैठकीला गैरहजर राहण्याबाबत तसे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले नव्हते. शिंदे हे आपल्याच पक्षातील आमदारांच्या रोषाचा सामना सध्या करीत आहेत. ‘आपले सरकार असूनही कामे होत नाहीत,’ असा सूर शिवसेनेच्या आमदारांनी लावला असून ते सातत्याने शिंदे यांच्याकडे तक्रारी करीत असतात. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदारांच्या बैठकीत या तक्रारींचा पाढा वाजला गेला होता. सेनेच्या राज्यमंत्र्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची ओरड सुरुवातीपासून केली जात आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून राज्यमंत्री संजय राठोड यांना तर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांचे राज्यमंत्री शिवसेनेचे दादा भुसे यांना अधिकार तर देत नाहीत. उलट, राज्यमंत्री म्हणून असलेल्या अधिकारांवर अधूनमधून गदा आणतात, अशी त्यांची तक्रार आहे. याबाबत स्वत: शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन-तीनवेळा तक्रार केली. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांमध्ये निधी कमी मिळतो, मंत्रालयात त्यांची कामे होत नाहीत, आमदारांना विश्वासात न घेता अधिकारीच निर्णय घेतात अशा शिवसेनेच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अलीकडेच शिवसेना मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या तक्रारींचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचण्यात आला होता. तरीही न्याय मिळत नसल्याने शिंदे यांनी बहिष्कारास्त्र काढले आहे.