शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या दौऱ्याने कुपोषण संपेल?

By admin | Updated: September 21, 2016 03:37 IST

महिला बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री,आदिवासी विकास मंत्र्यांचा सयुक्तिक दौरा उद्या जव्हार, मोखाडा,खोडाळा भागात होत आहे.

हितेन नाईक,

पालघर- कुपोषण, बालमृत्यू चा पालघर जिल्ह्यावर मागील २४ वर्षा पासून गडद होऊ पहात असलेला डाग पुसून काढण्याच्या दृष्टीने शासन, प्रशासन उदासीन असल्याने निष्पाप बालकांचे एकावर एक जात असलेले बळी पाहता उद्विग्न झालेल्या राज्यपालाच्या आदेशा नंतर महिला बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री,आदिवासी विकास मंत्र्यांचा सयुक्तिक दौरा उद्या जव्हार, मोखाडा,खोडाळा भागात होत आहे. या दाऱ्यातून कुपोषणाचा हा डाग पुसून टाकण्यासाठी काही ठोस घडणार कि नेहमी प्रमाणे हा दौरा आश्वासनाच्या खैरातीच्या वाटपाने संपुष्टात येणार या बाबत साशंकता व्यक्त होत आहे.कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टीने सरकारमार्फत आवश्यक पावले उचलली असल्याचा दावा अलीकडेच महिला बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला असला तरी त्यांच्याच खात्याच्या अखत्यारीतीतील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात कार्यरत १३ प्रकल्पापैकी १२ प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून जिल्ह्यातील २५७९ अंगणवाडी सेविकांपैकी ९१ पदे तर तितक्याच अंगणवाडी मदतनिसांपैकी १३५ पदे व मिनी अंगणवाडी सेविकांच्या ६०४ पैकी १११ पदे रिक्त असून या पदांच्या भरतीसाठी वारंवार पाठपुरावा करून आणि राज्य शासनाच्या कोअर कमिटीत निर्णय होवूनही पंकजा मुंडेंना त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. जिल्ह्यात ६०० बालकांचा कुपोषणामुळे वर्षभरात मृत्यू झाला व आजही असंख्य बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. त्याला या पदांची रिक्तता हे प्रमुख कारण असून पंकजा मुंडे या रिक्त पदांची उद्या तरी पूर्तता करीतअसल्याची घोषणा करतील काय?शिक्षण विभागात पालघर जिल्ह्या कार्यालया अंतर्गत ३४ पदे भरावयाचा निर्णय २५/७/२०१४ रोजी झाला होता. त्यातील ८ पदे भरण्यात, त्या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही उर्वरीत २६ पदे भरली जात नव्हती. अखेरीस शिक्षण विभागाला काल जाग येऊन त्यांनी ही २६ पदे मंजूर केली. हाच अनुभव प्रामुख्याने पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास व महिला ग्रामविकास खात्यांतर्गत रिक्त पदा बाबत दिसून येत आहे. किंबहुना जिल्ह्यातील बालमृत्यूसाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांना जबाबदार धरतांनाच महिला बाल विकास मंत्रीही तितक्याच जबाबदार आहेत हेच यातून दिसत आहे.>अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्वाची१३ गटाअंतर्गत २५७९ व ६०४ मिनी अंगणवाड्याची कुपोषणाच्या निर्मूलनाबाबत अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ० ते ६ वयोगटातील मुलांची जबाबदारी तसेच गरोदर मातांची जबाबदारीही यातील अंगणवाडी सेविकांवर असते. त्याचबरोबरीने यावर देखरेख ठेवण्यासाठी बाल विकास प्रकल्पाधिकारी यांची भूमिकाही त्याहून महत्वाची असते. असे असतानाही कुपोषणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यांची १३ पैकी १२ पदे रिक्त राहावीत व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांची पदेही रिक्त राहावीत ही गंभीर बाब आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांची वारंवार भेट घेऊन हि बाब त्यांच्या निदर्शनास आणून देखील त्याकडे पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष करावे याबद्दलही त्यांच्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुपोषणाचा विषय गाजत असताना आतातरी महिला बाल विकास मंत्र्यांनी पदभरतीची प्रक्रि या तात्काळ राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.