शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदी केळकर, चव्हाण की कथोरे?

By admin | Updated: April 19, 2016 02:12 IST

राज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीराज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर, रवींद्र चव्हाण व किसन कथोरे यांच्यात मंत्रीपदाकरिता रस्सीखेच सुरू आहे.भाजपा आमदारांत नाराजी दूर केली नाही तर महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे पक्षाला कठीण जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ठाणे जिल्ह्यातील भाजपा वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढवण्याची जबाबदारी संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यावर सोपवलेली आहे. सध्या ठाणे महापालिकेत भाजपाचे केवळ आठ सदस्य आहेत. शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताकदीचा मुकाबला केळकर-लेले जोडगोळीला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रीपद मिळावे, अशी केळकर यांची इच्छा असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून समजले. मात्र, केळकर हे मास लीडर नसल्याने त्यांना मंत्री करून पक्षाला किती लाभ होणार, असा सवाल त्यांचे विरोधक करीत आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपाची ताकद वाढवली. मागीलवेळी जेमतेम नऊ नगरसेवक असलेल्या भाजपाचे ४२ नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे त्याआधारे आपल्याला मंत्रीपद मिळावे, ही चव्हाण यांची अपेक्षा आहे. कल्याण-डोंबिवलीतील चव्हाण यांचे संघटन कौशल्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कुडाळ नगरपरिषदेत कमळ फुलवण्यासाठी माजीमंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याकरिता धाडले होते. मात्र, तेथे काँग्रेसने बाजी मारली असून भाजपाला १४ पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे चव्हाण यांच्या मंत्रीपदाच्या आकांक्षेला काहीसा धक्का बसल्याचे बोलले जाते.आ. किसन कथोरे हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुरबाड व ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढल्याने त्यांचा मंत्रीपदाचा दावा भक्कम आहे. मात्र, त्यांना नुकतीच प्रदेश भाजपाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रीपद देताना पक्षाने ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला तर कथोरे यांना पक्षातील पदावर समाधान मानावे लागेल. अन्य पक्षातून आलेल्या व्यक्तींना थेट मंत्रीपद देण्यास पांडुरंग फुंडकर व तत्सम ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे.आ. नरेंद्र पवार हे दुष्काळी भागात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाकरिता दानवे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. मुंबई मनपाबरोबर ठाण्याची निवडणूक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्वाधिक लक्ष हे मुंबईवर राहिल्यास ठाण्याची जबाबदारी समर्थपणे हाताळण्यासाठी एका आमदाराला मंत्रीपद देऊन ताकद द्यावी लागेल. आता फडणवीस यांची पसंती कुणाला, त्याची चर्चा आहे.