शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

मिनी बसला अपघात, ११ ठार

By admin | Updated: March 12, 2017 01:35 IST

तीन दिवसांची सुट्टी साधून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईहून निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात होऊन ११ जण मृत्युमुखी पडले.

उरुळी-कांचन (जि. पुणे) : तीन दिवसांची सुट्टी साधून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईहून निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात होऊन ११ जण मृत्युमुखी पडले. पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी-कांचन येथील इनामदार वस्तीजवळ शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका मुलीचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईतील मुलुंड आणि पुण्याजवळील अणे (ता. जुन्नर) येथील रहिवासी आहेत. मुलुंड येथून ज्योती कंपनीची प्रवासी बस अक्कलकोटला जात होती. उरळी-कांचन येथील मोटे यांच्या शेताजवळ बसच्या पुढे रानडुक्कर आडवे आले, त्याला वाचविण्याच्या नादात बसचालकाचा ताबा सुटला. रानडुकराला बस धडकल्यामुळे ते जागेवरच मृत झाले. त्याच्या अंगावरून ही बस जोरात दणका बसून उंच उडाली व रस्तादुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या १० चाकी अवजड वाहतूक करणाऱ्या मालट्रकला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ट्रकने बसला जवळपास ५० फूट फरफटत नेले. जयवंत नामदेव चव्हाण (वय ४८), योगिता जयवंत चव्हाण (४४), रेवती जयवंत चव्हाण (१४, तिघेही रा. यशोदाप्रसाद अपार्टमेंट, सज्जनवाडी, मुलुंड पूर्व). प्रदीप रामचंद्र अवचट (४९) आणि त्यांची पत्नी सुलभा (४४, रा. अणे, ता. जुन्नर, जि. पुणे), विजय बाळकृष्ण काळे (५८) आणि त्यांची पत्नी ज्योती (५८) (रा. नीता अपार्टमेंट, चाफेकर बंधू मार्ग, मुलुंड पूर्व), योगेश रामचंद्र लोखंडे (२३, रा. नवघर, कॅम्पस हॉटेलजवळ, मुलुंड पूर्व), शैलजा जगदीश पंडित (६८, रा. वसंत बंगला, तरखड, वसई प., जि. पालघर), कविता जय गीते (२८, जयगोपीनाथ चाळ, आगाबन अपार्टमेंट, ठाणे) तसेच लक्झरी बसचालक केतन सुरेश पवार (२९, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. (वार्ताहर)ट्रकचालक जखमी- कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी तातडीने धावून आले. त्यांच्या मदतीने व क्रेनच्या साह्याने पोलिसांनी जखमींना तत्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण सर्व जण मृतावस्थेत आढळले. ट्रकचालक अमोल ज्ञानदेव गायकवाड (२३, रा. शेळगाव (आर) जि. सोलापूर.) यांच्या बोटाला दुखापत झाली तर क्लीनर सचिन सुतार (२१, रा. पिंपरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर याच्या पाठीला मार बसून तो किरकोळ जखमी झाला आहे.