शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

‘एमआयएम’चे ‘टार्गेट’ संघभूमी

By admin | Updated: February 4, 2015 00:55 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या ‘एमआयएम’ने (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिन) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

असदुद्दीन ओवैसींच्या सभेची तयारी : पोलीस परवानगी देणार का?नागपूर : विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या ‘एमआयएम’ने (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिन) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथील सभेला कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. नागपुरातदेखील त्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून त्यांना सभेसाठी परवानगी देण्यात येणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.ओवेसी यांच्या अनेक सभा वादग्रस्त ठरल्या आहेत. आपल्या जहाल भाषणातून टीकेचे आसूड ओढणाऱ्या ओवैसी यांना हिंदुत्ववादी संघटनांचा नेहमीच विरोध राहीला आहे. अशा स्थितीत संघाच्या गृहनगरातच त्यांची सभा आयोजित करण्याचा ‘एमआयएम’चा प्रयत्न सुरू आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानात सभा आयोजित करण्याची परवानगी ‘एमआयएम’कडून मागण्यात आली आहे. या सभेमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याचा धोका आहे. यातूनच पुणे येथील सभेला परवानगी नाकारण्यात आली. आता नागपुरातदेखील ओवैसी यांची सभा होईल की नाही याचा निर्णय पोलीस प्रशासनावरच अवलंबून आहे. दरम्यान, सभेअगोदर ओवैसी उपराजधानीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. शिवाय पुढील रणनीतीबाबत चर्चादेखील करतील. जर प्रशासनाने परवानगी नाकारली तर काही कायदेशीर आधार घ्यायचा का याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे ‘एमआयएम’चे प्रवक्ते शकील पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राजकारण तापण्याची शक्यताओवैसी यांच्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण होणारे मुद्दे असतात असे आरोप वारंवार निरनिराळ््या संघटनांकडून लावण्यात आले आहेत. अशा स्थितीत जर सभेला परवानगी मिळाली तर निश्चितच नागपुरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव आहेत. अशा स्थितीत यांना एकत्रित ‘व्होटबँक’ बनविण्यासाठी ‘एमआयएम’कडून प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात नागपुरात ‘एमआयएम’चे कार्यालय सुरू झाले होते.