शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’च फॅक्टर!

By admin | Updated: April 24, 2015 01:45 IST

हिंदुत्वाचे कार्ड चालवत शिवसेना-भाजपा युतीने सहाव्यांदा औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेतली; पण मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचा प्रबळ

हिंदुत्वाचे कार्ड चालवत शिवसेना-भाजपा युतीने सहाव्यांदा औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेतली; पण मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून झालेला उदय हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य. याचा अंदाज विधानसभा निवडणुकीनंतर आला होता; पण अंतर्गत लाथाळ्यांमुळे हा पक्ष महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करू शकणार नाही हा अनेकांचा अंदाज त्यांनी खोटा ठरविला.२९ जागा जिंकून शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. पूर्वी त्यांच्या ३० जागा होत्या; पण त्या वेळी ९९ वार्ड होते, आता ते ११३ झाले. त्या तुलनेत त्यांची शक्ती वाढली नाही. उलट महापौर कला ओझा आणि माजीमहापौर अनिता घोडेले या पराभूत झाल्या. गुलमंडी हा सेनेचा गड. येथे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आताही सेनेला येथे बंडखोरांनी धूळ चारली. खा. चंद्रकांत खैरे यांनी महापालिका जिंकली असली तरी महापौर कला ओझा आणि त्यांचे पुतणे सचिन खैरे हे त्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. समर्थनगरातून त्यांचा मुलगा हृषीकेश निवडून आला. या तीन जागा खैरे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. गुलमंडीत पप्पू व्यास यांची बंडखोरी त्यांना शमविता आली नाही, तर बाळकृष्णनगरातील संताप मतपेटीत व्यक्त झाला. जागांचा विचार करता सेनेसाठी काळजी करण्यासारखे आहे.