शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांचे कोट्यवधी रुपये संकटात

By admin | Updated: July 18, 2016 05:01 IST

महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्यांमधील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत गोंधळाची स्थिती

मुंबई : महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्यांमधील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत गोंधळाची स्थिती असताना, आता नव्याने आणि खुल्या निविदा काढण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिला बचत गटांनी केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक संकटात सापडली आहे. प्रत्येक बचत गटाने ७५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली आहे. महिला बचत गटांकडून या आहाराच्या पुरवठ्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि ७० महिला बचत गट त्यासाठी पुढे आले. ५२ निविदा स्वीकृत करण्यात आल्या होत्या. जवळपास ३५० कोटी रुपयांच्या पूरक आहार वाटपाचे हे काम होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता या प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्याचा नेमका अर्थ काय, हे महिला व बालकल्याण विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. महाराष्ट्र महिला शक्ती महासंघाच्या अध्यक्षा संजना घाडी यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळाने महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन महिला बचत गटांकडून हे काम काढण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. त्यासाठी कंत्राटदार मामा-भाच्याची एक जोडी प्रयत्नशील आहे. महिला संस्थांच्या नावे विविध शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरविणाऱ्या या कंत्राटदारांनी खोटे बाजारभाव देऊन अव्वाच्या सव्वा दराने पुरवठा केल्याच्या आधीच गंभीर तक्रारी आहेत. मध्य प्रदेशमध्ये राज्य शासनाच्या कंपनीच्या नावाखाली भागिदारी करून दिल्ली व जयपूर येथील दोन बड्या कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात कामे मिळविली. हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात आणण्याच्याही हालचाली केल्या जात आहेत. संजना घाडी यांनी सांगितले की, ‘आम्ही या सर्व बाबींची पंकजा मुंडे यांना कल्पना दिली आहे. महिला बचत गटांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे.’ (विशेष प्रतिनिधी)