शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या मतांतून ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर

By admin | Updated: March 30, 2016 18:39 IST

महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर कोण हे ठरवण्यासाठी अक्षरश: लाखोंच्या संख्येने मतदान झाले असून आज संध्याकाळी सहा वाजता ठरल्याप्रमाणे मतदानाची मुदत संपलेली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - विविध क्षेत्रांमधले मानाचे महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर कोण हे ठरवण्यासाठी अक्षरश: लाखोंच्या संख्येने मतदान झाले असून आज संध्याकाळी सहा वाजता ठरल्याप्रमाणे मतदानाची मुदत संपलेली आहे. कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, तंत्रज्ञान, बिझनेस, इन्फ्रास्ट्रक्चर, समाजकारण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील आपल्या पसंतीचे मानकरी ठरवण्यासाठी आणि त्यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचे आपल्या पसंतीचे मानकरी निवड करण्यासाठी लोकमतच्या वाचकांनी दहा लाखांहून जास्त मतदान केले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारांबाबत ज्यांची नामांकने झाली आहेत, त्यांच्याबरोबरच वाचकांचीही उत्सुकता कमालीची वाढत चालल्याचे दिसत आहेत.
या पुरस्कारांसाठी लोकमतच्या लाखो वाचकांनी मतदान केल्याने मराठी महाराष्ट्रीयन माणसाचे लोकमतवरील प्रेम जसे दिसून आले, तसेच मराठी माणून आणि लोकमतचा वाचक अधिकाधिक नेटसॅव्ही होत चालल्याचेही सिद्ध झाले. लक्षणीय बाब म्हणजे नेटद्वारे आपला कौल देणाऱ्यांमध्ये ग्रामीण वाचकांची संख्याही मोठी आहे. ज्युरी आणि लोकमतचे वाचक यांच्या मतांतूनच विविध क्षेत्रांतील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरणार असल्याने आपले मत निर्णायक ठरावे, यासाठी वाचकांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
ज्यांना या पुरस्कारासाठी नामांकने मिळाली आहेत, ते सर्व जण आपापल्या क्षेत्रांतील दिग्गज तर आहेतच, पण त्यांची लोकप्रियताही खूप मोठी आहे, त्यांच्यापैकी काही शहरी आहेत, तर काही ग्रामीण भागांतून येउन संपूर्ण महाराष्ट्रात आपली ठसा उमटवणारे आहेत. या दिग्गजांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सकारात्मक आणि प्रेरणादायक असल्याचे त्यांच्यापासून स्फूर्ती घेत आणखी असे नामवंत महाराष्ट्रात तयार व्हावेत, अशी लोकमची भूमिका आणि इच्छा आहे.
हा सोहळा १ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. मोठ्या दिमाखात होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला राजकारण, समाजकारण, चित्रपट, संगीत, रंगभूमी, प्रशासन, उद्योग, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमधील सेलिब्रिटी कलाकार, नेते आणि मान्यवर हजेरी लावणार आहेत. लोकांचे मताचा मान ठेवणारा हा समारंभ त्यामुळेच रंगतदार होणार आहे.
समारंभांचा, निवड झालेल्या मान्यवरांचा लाईव्ह वृत्तांत आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोतच.