शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आधार निधीच्या नावाने लाखो हडप

By admin | Updated: August 13, 2016 20:21 IST

आल्तिनो येथील आयटीआयचा ज्येष्ठ इन्स्ट्रक्टर के. हेन्री डॅनिएल मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाखाली युवकांकडून पैसे घेत होता अशी माहिती तपासातून उघड झाली आहे

- वासुदेव पागी / ऑनलाइन लोकमत 
पणजी, दि. 13 - विद्यार्थ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलेला आल्तिनो येथील आयटीआयचा ज्येष्ठ इन्स्ट्रक्टर के. हेन्री डॅनिएल मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाखाली युवकांकडून पैसे घेत होता अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. 
 
कँबिनेट सचिव म्हणून बोगस ओळखपत्र तयार करून त्याचा गैरवापर त्याने चालविला होता. त्याच ओळखपत्राचा उपयोग करून तो आपले प्रशासनात फार मोठे वजन असल्याचे सांगत होता आणि बेरोजगार युवक आणि युवतींना नोकरी देण्याचे आमिष दाखवित होता. त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेत होता. हे पैसे स्वतःसाठी नसून आपद्ग्रस्तांसाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी आहे. हा पैसा त्या खात्यात आपण जमा करतो असे तो सांगत होता. प्रत्येकाकडून 3 हजारापासून 23 हजार रुपये तो घेत होता. ज्या युवकांची त्याने फसवणूक केली त्यांच्याकडूनच त्यांच्या या हरकतीचा भांडाफोड करण्यात भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पोलिसांनी यश मिळविले. 
 
पैसे घेऊनही नोकऱ्या न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांची अमुक खात्यात नोकरभरती होणार आहे वगैरे सांगून तो समजूत घालत होता अशी माहितीही उघडकीस आली आहे. 
 
आयटीआमध्ये प्रवेश देण्यासाठी उमेदवाराकडून दीड हजाराची रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर तो राहत असलेल्या बांबोळी येथील सरकारी निवासात पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्याच्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांची शैक्षणिक प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. त्याचवेळी हा माणूस नोकरी देण्याचे आमिष दाखवून युवक युवतींना फसवीत असावा असा पोलिसांना संशय आला होता. ज्या युवक युवतींची प्रमाणपत्रे पोलिसांना मिळाली होती त्या युवक युवतींना संपर्क केल्यानंतर हेन्रीच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड झाला.
 
हेन्रीच्या भनगडींची यादीच पोलिसांनी मिळविली आहे. पगाराचे बोगस प्रमाणपत्र लावून त्याने डिचोली येथील एका बँकेकडून कर्जही मिळविल्याचे उघड झाले आहे.  म्हापसा येथे २००५ साली बोगस महाविद्यालय उघडून शुल्काद्वारे लाखो रुपये बळकावल्यााचा गुन्हा त्याच्यावर नोंदविण्यात आला होता. 
 
फसवणूक मुख्य धंदा
हेन्री हा आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टरची नोकरीला जरी असला तरी ही नोकरी त्याच्या कमाईचा मुख्य  स्रोत नव्हता. मुख्य स्रोत होता फसवणूक, घोटाळे आणि भ्रष्टाचार. आयटीआयमधील विद्याथ्यार्थ्यांकडूनही तो आपले स्वतःचे किरकोळ खर्च करून घेत होता. मोबाईल रिचार्ज करून घेणे तर नित्याचा क्रम होता.