शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या जाणकाराची लाखोंची फसवणूक

By admin | Updated: October 7, 2016 05:29 IST

वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या हायकोर्टाच्या वकिलाला आपल्याला चार कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि कायद्याचा जाणकार असलेल्या वकिलाची नियत फिरली

मुंबई : वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या हायकोर्टाच्या वकिलाला आपल्याला चार कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि कायद्याचा जाणकार असलेल्या वकिलाची नियत फिरली. अर्ध्याहून अधिक आयुष्य फसवणुकीचे खटले लढण्यात गेले असतानाही हा वकील ठगाच्या जाळ्यात अडकला. या वकिलाची ठगांनी १८ लाखांची फसवणूक केली. वकिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.काळाचौकी परिसरात तक्रारदार वकील कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या काळात जेकब अ‍ॅण्डरसन याने मेलद्वारे तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. मुकेश अंबानी फाउंडेशनतर्फे आपल्याला ४.५ करोडची लॉटरी लागली आहे. ब्रिटिशांनी दावा न केलेल्या पैशांतून बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. करोडपती होण्याच्या नादात कायद्याचे ज्ञान विसरून, अनुभव विसरून त्यांनी या मेलला रिप्लाय दिला. मासा गळाला लागल्याचे लक्षात येताच या ठगाने सुरुवातीला प्रोसेसिंग फी म्हणून ९ हजार रुपये द्यावे लागतील असे कळविले. उत्साहाच्या भरात वकिलाने ही रक्कम मनी ट्रान्सफरद्वारे पाठविली. त्यानंतर मालेगम आणि अल्पना शर्मा यांच्या नावाने त्यांना मेल आले. त्यांनी सांगितल्यानुसार, तक्रारदार हे पैसे देत गेले. घरच्यांना सरप्राइज देण्यासाठी त्यांनी त्यांनाही याबाबत अंधारात ठेवले. जवळपास ४० वेळा केलेल्या व्यवहारादरम्यान वकिलाने १८ लाख ३६ हजार रुपये या टोळीला दिले. ही टोळी मेलद्वारे आरोपींच्या संपर्कात होती. पैसे देण्यास उशीर होताच त्यांना फोन करून संपर्क साधायची.त्यांनी दिलेले पैसे हे दिल्ली, चेन्नई, कोलकाता या भागातून काढण्यात आले आहेत. काळाचौकी पोलीस कॉल रेकॉर्डवरून या आरोपींचा शोध घेत आहेत. उच्च न्यायालयात वकील असलेले तक्रारदार यांनी आजवर अनेक खटले लढविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे ब्रेनवॉश करून या जाळ्यात अडकविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय मनी ट्रान्सफरद्वारे त्यांनी दिलेल्या पैशांच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत.पत्नीला या प्रकाराची कुणकुण लागताच हे प्रकरण उजेडात आले. त्यांनी याबाबत मित्र आणि नातेवाइकांकडे विचारणा केली आणि पतीसह काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)