शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लाखो डोळ्यांनी पाहिला रिंगण सोहळा !

By admin | Updated: July 6, 2016 17:43 IST

याचि देही, याचि डोळा अगा म्या पाहिला माउलींचा रिंगण सोहळा..! टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ह्यमाउली-माउलीह्णचा जयघोष, रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. ६  : याचि देही, याचि डोळा अगा म्या पाहिला माउलींचा रिंगण सोहळा..! टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ह्यमाउली-माउलीह्णचा जयघोष, रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला.

हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी डोळ्यांत साठविला. लोणंद येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून माउलीची वारी बुधवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाली. माउलींचा मानाचा नगारखाना रिंगणस्थळी आला, तेव्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. या पावसाच्या सरीतच वारक-यांनी नाचण्यास सुरुवात केली. सायंकाळी चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले.

रिंगणाचा सोहळा 'याचि देही, याचि' डोळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लोक आले होते. धावत येणारा माउलींचा अश्व पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा आतूर झाल्या होत्या. अशातच माउलींचा अश्व व स्वाराचा अश्व एकमेकापाठोपाठ धावत आले. रथापुढील व मागील दिंड्यांपर्यंत धावत गेल्यावर पुन्हा अश्व रथाकडे वळून, त्यातील पादुकांचे दर्शन घेतले गेले.

यावेळी अश्वांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी धाव घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अश्वांच्या टापांची माती ललाटी लावण्यासाठी वारक-यांची एकच झुंबड उडाली. यावेळी असंख्य वारकरी पारंपरिक खेळ खेळण्यात दंग होते. त्यानंतर डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भागवत पताका घेऊन वैष्णव ह्यग्यानबा-तुकारामह्ण असा जयघोष करत होते.