शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात लाखो कृषी पंपाचे उर्जीकरण!

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे.

आठ जिल्ह्यातील चित्र : कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण!

ब्रम्हानंद जाधव - बुलडाणाकृषी पंपाना विद्युत जोडणी करून कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले असून गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. कृषी पंपांना वीज जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. डॉ. दांडेकर समितीने १९८४ मध्ये तसेच अनुशेष व निर्देशांक समितीने १९९७ मध्ये सादर केलेल्या अहवालात कृषी पंपांचा अनुशेष ठरवताना प्रत्येक जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेले एकूण कृषी पंप आणि एकूण पिकाखालील क्षेत्र याचा विचार करून प्रती हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्रामागे असलेले कृषी पंप यांची सरासरी काढली, तसचे ज्या जिल्ह्याची सरासरी राज्यापेक्षा जास्त आहे, तेथे अनुशेष नाही आणि राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनुशेष आहे, असे ठरवण्यात आले होते. राज्य सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांची संख्या गृहित धरून भौतिक अनुशेष ठरवण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या नऊ जिल्ह्यांत १ लाख ७१ हजार ७४२ अशाप्रकारे कृषीपंप विद्युतीकरणाचा अनुशेष निर्धारित केला होता. विदर्भातील या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यांमधील कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष कायम राहत होता. परंतू सध्या विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ४१ हजार ४६३ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ७ हजार २३, यवतमाळ जिल्ह्यात ४७ हजार ७७६, वर्धा जिल्ह्यात २ हजार ७३९, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १६ हजार ७४६, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ हजार ७९२, गडचिरोली जिल्ह्यात १५ हजार ७२१ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. कृषी पंप विद्युतीकरणाचे अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातून निवडलेल्या आठ जिल्ह्यापैकी केवळ गडचीरोली जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला नाही.दोन जिल्ह्यांचा अनुशेष शिल्लकअनुशेष व निर्देशांक समितीने कृषीपंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष घोषीत केलेल्या १५ जिल्ह्यात अनुशेष शिल्लक होता. त्यापैकी सध्या रत्नागिरी व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुशेष शिल्लक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेंअतर्गत कृषीपंप वीज जोडणी घेण्यास पात्र राहणार आहेत. तसेच १०७ अश्वशक्तीपर्यंत वीजभार असलेल्या कृषीपंपानाच सदर योजनेंतर्गत वीज जोडणी घेण्यासाठी लाभार्थी पात्र राहणार आहेत.