शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालून महाठग फरार

By admin | Updated: September 24, 2016 04:14 IST

महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव, त्याचा मुलगा कार्तिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा वनराई पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई : गुंतवणुकीच्या रकमेवर १८0 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांसह मुंबईकरांना गंडा घालून पसार झालेल्या महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव, त्याचा मुलगा कार्तिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा वनराई पोलीस शोध घेत आहेत. या रॅकेटद्वारे श्रीवास्तव कुटुंबाने गुंतवणूकदारांचे सुमारे सातशे ते हजार कोटी रुपये हडप केल्याचा पोलिसांचा संशय आहे. माहीम येथील डॉ. केदार गानला यांनी केलेल्या तक्रारीने हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वनराई पोलिसांनी मोहनप्रसाद, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, मुलगी अर्चिता, सून प्रीती या श्रीवास्तव कुटुंबीय तसेच धर्मेंद्र निकुंभ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीवास्तव कुटुंबीय उत्तर प्रदेशात पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. डॉ. गानला यांच्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस दलातील सहायक निरीक्षक भीमराव वनमाने आणि अर्जुन रजाणे यांनी त्यांची गोरेगाव (पूर्व) येथील फिल्मसिटी रोडवरील सॅटेलाईट टॉवरमध्ये राहणाऱ्या मोहनप्रसाद श्रीवास्तव आणि त्याची पत्नी विभा यांच्याशी ओळख करून दिली होती. त्या भेटीत गुंतवणुकीवर भरघोस व्याज देणाऱ्या अनेक योजना आपल्याकडे असल्याचे श्रीवास्तव दाम्पत्याने सांगितले. त्यानंतर आपण आपल्या काही मित्रांसोबत श्रीवास्तव कुटुंबीयांकडे गेलो असता या दाम्पत्याने त्यांचा मुलगा कार्तिक, सून प्रीती आणि मुलगी अर्चिता यांच्याशी ओळख करून दिली. कार्तिक हा लंडन येथील युरोपियन बँक, यूबीएस बँक येथे प्रमुख गुंतवणूक अधिकारी तसेच संपत्ती व्यवस्थापन या पदावर होता. कार्तिकच्या योटासीस कन्सल्टन्सी, कार्तिक न्युट्रोसेक्युटीक, ग्रास रूट सॉफ्टवेअरसह एकूण नऊ कंपन्या असून, या कंपन्या इतर बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ९ ते १४ महिन्यांत १८0 टक्के व्याज मिळवून देतात, असे या दाम्पत्याने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. गानला आणि त्यांच्या मित्रांसोबत श्रीवास्तव कुटुंबाने बड्या हॉटेलमध्ये सहा बैठका घेतल्या. सगळे आरोपी अतिशय महागड्या कारमधून तेथे येत असत. त्या बैठकांमध्ये श्रीवास्तव परिवाराने मोठमोठे राजकीय नेते, आयपीएस अधिकारी आणि अभिनेत्यांसोबत असलेली आपली छायाचित्रेही डॉ. गानला यांना दाखवली. त्या सगळ्याचा प्रभाव पडलेल्या डॉ. गानला आणि त्यांच्या मित्रांनी एकूण ३५ कोटी रुपये धनादेश आणि रोखीने कार्तिकच्या हवाली केले. त्याबदल्यात कार्तिकने या गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि व्याज अशा रकमेचा गोरेगावच्या अ‍ॅक्सिस बँकेचा पुढील तारखेचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश वटण्याच्या तारखेआधी कार्तिकने आपल्याला फोन करून बँकेत रक्कम नसल्याने धनादेश बँकेत जमा न करण्याची विनंती केली. बँकेत धनादेश टाकण्याची पुढील तारीख आपण फोन करून कळवू, असेही सांगितले. मात्र तसा फोन न आल्याने चौकशी केली असता श्रीवास्तव कुटुंबीय पसार झाल्याचे समजले आणि आपल्या पायाखालील जमीन सरकल्याचे डॉ. गानला यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. गानला यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून तपास करीत वनराई पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४0६, ४0९, ४२0, १२0 ब आणि एमपीआयडी ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. केवळ डॉ. गानला आणि त्यांच्या परिचित डॉक्टरांचे ३५ कोटी रुपये हडप केले असून, इतर गुंतवणूकदारांमध्ये २५0हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच अन्य सरकारी अधिकारी आहेत. मात्र यात अडकलेले सरकारी अधिकारी तक्रार करण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना निवेदन सादर करून आर्थिक गुन्हेविरोधी विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)