शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी अंगणवाड्यांत लाखोंचा कपाट घोटाळा

By admin | Updated: July 4, 2016 03:51 IST

अंगणवाडयासाठी कपाटे घेण्यासाठी आलेला निधी अंगणवाडी कार्यकर्त्याकडून पुन्हा जमा करून त्यांना निकृष्ट दर्जाची कपाटे पुरवून त्यात अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार

सुरेश काटे,

तलासरी- अंगणवाडयासाठी कपाटे घेण्यासाठी आलेला निधी अंगणवाडी कार्यकर्त्याकडून पुन्हा जमा करून त्यांना निकृष्ट दर्जाची कपाटे पुरवून त्यात अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.तलासरी तालुक्यातील १५३ अंगणवाडयांना कपाट व खुर्ची खरेदी साठी प्रत्येकी रुपये पाच हजार प्रमाणे सात लाख पासष्ट हजाराचे अनुदान आले. व ते प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्त्याच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले. त्यातून त्यांनी चांगल्या दर्जाची कपाटे खरेदी करावयाची होती. परंतु आलेल्या अनुदानातून कार्यकर्त्याना कपाटे खरेदी करू न देता अनुदान कार्यालयात पुन्हा जमा करा, आपण एकत्र कपाटे खरेदी करून पुरवठा करू असे आदेशिण्यात आले. त्यामुळे नाइलाजाने अंगणवाडी कार्यकर्त्यांनी रुपये पाच हजाराचे अनुदान कार्यालयात जमा केले. त्यातून चांगल्या दर्जाची कपाटे मिळणे अपेक्षित होते परंतु ठेकेदाराने पुरवठा केलेल्या कपाटांची दारे गळून पडली. व त्यांचा दर्जा स्पष्ट झाला. आता अधिकाऱ्यांना ही बोलता येत नाही आणि कपाट वापरता येत नाही. अशा स्थितीत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी अंगणवाडयांना भेट देऊन पाहणी केली असता दोन ते अडीच हजार रुपयात मिळणारी निकृष्ट दर्जाची कपाटे पुरविल्याचे आढळून आले. या बाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प तलासरीचे अधिकारी मोरे यांच्या कडे विचारणा केली असता अनुदान कार्यकर्त्याच्या खात्यावर जमा करण्यात आले असून ते त्यांनी संघटने मार्फत एकत्र जमा करून कपाटे खरेदी केली असा खुलासा केला. त्यामुळे आता या भ्रष्टाचाराचा सूत्रधार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.