शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची अपसंपदा

By admin | Updated: November 17, 2014 00:54 IST

बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या १४ पैकी ४ आरोपींकडे एसीबीच्या पथकाला बेहिशेबी मालमत्तेचे घबाड सापडले. यापैकी सर्वाधिक १ कोटी ३० लाखांची मालमत्ता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

बंधारे बांधकामाचा घोटाळा : चौघांच्या घराची झडतीनागपूर : बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या १४ पैकी ४ आरोपींकडे एसीबीच्या पथकाला बेहिशेबी मालमत्तेचे घबाड सापडले. यापैकी सर्वाधिक १ कोटी ३० लाखांची मालमत्ता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव बापूजी भांडारकर यांच्याकडे मिळाली आहे. दरम्यान, चौघांच्या घरझडतीची कुणकुण लागताच इतरांनी आपली बेहिशेबी मालमत्ता दडवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. २००६-०७ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेकडून ३० बंधारे बांधकामासाठी २.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे कागदोपत्री बांधकाम करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळी लाखोंची अफरातफर केली. या गैरप्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कडे आली होती. एसीबीने संबंधित वरिष्ठांकडून त्याची सखोल आणि प्रदीर्घ चौकशी केली. या चौकशीत ६५ लाखांच्या निधीची अफरातफर झाल्याचे उघड झाले. त्यावरून एसीबीने लघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बलदेव माधव सांगोडे (५९), चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व्यंकट आयला सोमयाजूला (५९), सिंचन विभागाच्या नरखेड उपविभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता नामदेव अप्पा गजभिये (५९), जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नंदकिशोर नारायणदास पुरोहित (४६), सिंचन विभागाचे दिलीप सुधाकर सातफळे (४७), सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता कृष्णराव लक्ष्मण झलके (६१), जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर वरुडचे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी प्रकाश तट्टे, खाजगी कंत्राटदार वसंत चंद्रभान निकाजू, चंदू केशव चरपे, अशोक एम. ठाकूर, राहुल रमेश श्रीवास्तव, यशवंत रामराव काळबांडे, गंगाधर कुमेरिया या १४ जणांविरुद्ध एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी गुन्हे दाखल केले. त्यातील भांडारकर, पुरोहित, सातफळे आणि तट्टे या चौघांच्या निवासस्थानी एसीबीच्या पथकाने शनिवारपासून झडती घेतली. झडतीत या अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)मालमत्ता, कागदपत्रांची लपवाछपवीएसीबीने गुन्हे दाखल करून घरझडती घेण्यास प्रारंभ केल्यामुळे या प्रकरणातील आरोपी सतर्क झाले आहेत. त्यांनी आपली रोकड तसेच बेहिशेबी मालमत्ता दडविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. याचमुळे सातफळे आणि तट्टे यांच्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांना किरकोळ मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली. दरम्यान, या आणि अशाच कोणत्याही गैरव्यवहाराची माहिती असल्यास एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा, असे आवाहन एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे. कुणाकडे काय सापडले!वासुदेव भांडारकर सध्या जवाहरनगर (सुभेदार लेआऊट) मध्ये राहतात. त्यांच्याकडे १ कोटी, ३० लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडली. त्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक, मुदत ठेवी आणि विमा पॉलिसी ६४ लाख, ८१ हजार. घर, सदनिका आणि इतर स्थावर संपत्ती ४० लाख, ७५ हजार तसेच २५ लाखांच्या वाहने, फर्निचर आणि उपकरणाचा समावेश आहे. नंदकिशोर पुरोहित बजाजकमल अपार्टमेंट, आयचित मंदिराजवळ, नागपूर यांच्याकडे तूर्त १० लाखांच्या संपत्तीची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली.दिलीप सातफळे हे बेसा येथील पद्मावती नगरात राहातात. त्यांच्याकडूनही ५ लाखांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली.प्रकाश तट्टे हे अमरावती येथील रोहिणी पार्कच्या मागे कृष्णप्रकाश, शुभम लेआऊटमध्ये राहातात. त्यांच्याकडे एसीबीला १ लाखाची रोकड, ७ लाखांचे सहकारी बँकेचे धनादेश अन्य ४ लाखांची मालमत्ता, याशिवाय २५ लाखांचे त्यांचे निवासस्थान, या मालमत्तेची माहिती हाती लागली.