शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत

By admin | Updated: May 9, 2016 04:23 IST

सोमवारी (९ मे) सकाळी १० वाजता वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात गिरणी कामगारांसाठीच्या २ हजार ६३४ घरांकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे

मुंबई : सोमवारी (९ मे) सकाळी १० वाजता वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात गिरणी कामगारांसाठीच्या २ हजार ६३४ घरांकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे. एकूण सहा गिरण्यांच्या गिरणी कामगारांच्या सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार असून, यामध्ये भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबली या गिरण्यांचा समावेश आहे.ज्या गिरणी कामगाराने ज्या गिरणी संकेत क्रमांकांची माहिती दिली आहे; त्याच संकेत क्रमांकासाठी अर्जदाराची सोडत काढली जाणार आहे. गिरणी कामगार पती/पत्नी/वारसांपैकी मूळ गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांचा एकाच सदनिकेसाठी विचार करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्जांचा वितरणासाठी विचार केला जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे लॉटरी, निश्चिती आणि सदनिका वितरणाची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल, असे म्हाडातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, संगणकीय सोडतीमध्ये कोणत्याही प्रकाराचा मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. म्हाडाने दलाल नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)