शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगार कर्जाच्या खाईत

By admin | Updated: July 14, 2015 01:20 IST

मुंबईच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांना साडेसात लाख रुपये किमतीची ६९२५ घरे घोडपदेव येथे देण्यात आली. मात्र या घरांकरिता कर्ज

मुंबई : मुंबईच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांना साडेसात लाख रुपये किमतीची ६९२५ घरे घोडपदेव येथे देण्यात आली. मात्र या घरांकरिता कर्ज घेतलेल्या बहुतांश कामगारांनी हप्ते थकवल्याने आता बँकेकडून त्यांना नोटिसा येत आहेत. मात्र हे वास्तव नजरेआड करून १६ लाख रुपये किमतीच्या घरांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.गिरणी कामगारांच्या संपामुळे हद्दपार झालेल्या कामगाराला पुन्हा मुंबईत हक्काचे घर देण्याकरिता गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. ही घरे मोफत द्यावी, अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली होती. मात्र गिरणी कामगार कृती संघटनेने साडेसात लाख रुपयांना घरे देण्याची सरकारची मागणी मान्य केली. याकरिता मुंबई बँकेने व अन्य काही सहकारी बँकांनी कर्ज दिले. ज्या गिरणी कामगाराला त्याच्या सेवेकरिता तीन ते साडेतीन लाखांपेक्षा जास्त भरपाई मिळाली नाही त्याला हे घर घेणे महागडे ठरेल ही कैफियत सरकार व अन्य कामगार संघटनांनी ऐकून घेतली नाही.घोडपदेव येथे घरे मिळालेल्या ६९२५ कामगारांपैकी ६०० कामगारांना ऐपत नसल्याने घर घेणे परवडले नाही. सध्या या कामगारांपैकी ४० टक्के कामगारांनी कर्जाचा बोजा परवडत नसल्याने घरे बेकायदा विकल्याचे कामगार संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. उर्वरित ६० टक्के कामगारांपैकी ९० टक्के कामगारांनी घरे भाड्याने देऊन दहिसर, बदलापूर येथे जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ज्यांंनी कर्ज फेडून मुंबईत वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी अनेकांचे हप्ते थकले. त्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. (विशेष प्रतिनिधी)पवारांचे नेतृत्व हे तर विडंबनगिरण्यांच्या जमिनी विकसित करण्याकरिता विकास नियंत्रण नियमावलीत १९९१मध्ये केले गेलेले बदल हे शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत झाले. संपाची तीव्रता संपल्यावरही गिरण्यांमध्ये १ लाख ६० हजार कामगार काम करीत होते. गिरणी मालक जमिनीचा विकास करून गिरण्यांचे आधुनिकीकरण करून गिरण्या चालवतील, अशी बतावणी सरकारकडून केली गेली होती. आता त्याच पवार यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांना घरे मिळावीत याकरिता मोर्चा काढणे हे विडंबन असल्याची टीका सर्व श्रमिक संघटनेचे सरचिटणीस विजय कुलकर्णी यांनी केली. मुंबई टेक्सटाईल मिलमध्ये २५ वर्षे नोकरी केली. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घराकरिता माझी निवड झाली. मुंबई बँकेकडून कर्ज घेऊन घर घेतले. मात्र गेले पाच ते सहा महिने हप्ते न भरल्याने बँकांच्या नोटिसा येत आहेत. माझ्यासारखीच अन्य कामगारांची अवस्था आहे.- सुभाष पारकर, गिरणी कामगार