शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दूध महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 04:43 IST

परराज्यातील दूध संघांची घुसखोरी मोडीत काढण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले आहेत.

पुणे : परराज्यातील दूध संघांची घुसखोरी मोडीत काढण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले आहेत. त्यांनी दूध खरेदीदरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, तर विक्रीतही प्रतिलिटर २ रुपये वाढ करून ग्राहकांच्या खिशालाही कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात रविवारी सहकारी व खासगी दूध संघांची बैठक झाली. यात दूधखरेदी व विक्रीदरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दरवाढीची माहिती दिली. गाईच्या दूधखरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्यात आलेली आहे. सध्याचा शासनाचा २२ रुपये दर असून आता ३ रुपयांनी वाढ केल्याने तो २५ रुपये झाला आहे. मात्र तो ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी असेल. दूध विक्रीदरामध्येही तीन रुपये वाढ होणार आहे. मात्र ग्राहकांसाठी दोन रुपये वाढ व एक रुपया डीलर व डेअरी सहन करेल. म्हणजेच ४० रुपये असणारा विक्रीदर आता ४२ रुपये होईल. तसेच म्हैस दूधविक्रीचे एमआरपीमध्येदेखील दोन रुपये वाढ होऊन ते ५४ रुपये होणार आहे. परराज्यातील दूध संघांची घुसखोरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी दूध संघ एकत्रित आले असून भविष्यात वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना फटकाच्गाईच्या दूधखरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्यात आलेली आहे. सध्याचा शासनाचा २२ रुपये दर असून आता ३ रुपयांनी वाढ केल्याने तो २५ रुपये झाला आहे.  हा दर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी असेल. दूध विक्रीदरामध्येही तीन रुपये वाढ होणार आहे. मात्र ग्राहकांसाठी दोन रुपये वाढ व एक रुपया डीलर व डेअरी सहन करेल. म्हणजेच ४० रुपये असणारा विक्रीदर आता ४२ रुपये होईल. तसेच म्हैस दूधविक्रीचे एमआरपीमध्येदेखील दोन रुपये वाढ होऊन ते ५४ रुपये होईल.