शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दूधगंगा संघ पुन्हा बंद पडले

By admin | Updated: April 8, 2017 01:37 IST

कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली

इंदापूर : दूधगंगा दूध उत्पादक संघ पुन्हा बंद पडला आहे. कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. शासनाने दूधगंगा दूध संघावर प्रशासक नेमावा अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.राज्य शासनाने दि. २४ आॅगस्ट २०१६ रोजीच्या आदेशाने दूधगंगा दूध संघ अवसायानात काढला आहे. त्या आदेशाच्या विरोधात संचालक मंडळाने अपील केले आहे. त्याची सुनावणी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमोर दि. २६ सप्टेंबर २०१६ रोजी पार पडली. त्यावरील अंतिम निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान एका खासगी व्यक्तीला दूध संघ चालविण्यास दिला. केवळ तीन महिन्यांचे पगार वेळेवर झाले. पंचायत समितीच्या निवडणूक निकालाच्या दिवशीच दूध संघ बंद केला. संघ बंद झाल्याने, या निवडणुका व कामगारांची मते डोळ्यांसमोर ठेवून काही काळापुरता दूध संघ चालू ठेवण्यात आला. संचालक मंडळाला संघ व्यवस्थित चालवता येत नसेल तर शासनाच्या आदेशाला अपील करुन संघ ताब्यात ठेवण्याचा अट्टहास कशासाठी, अशी विचारणाही कामगारांनी केली आहे.पत्रकारांशी बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश म्हेत्रे, उपाध्यक्ष गणपतराव पवार म्हणाले, की सध्या संघाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. महावितरणची वीजबिलाची थकबाकी पाच लाख रुपये झाली आहे. दोन महिन्यापासून वीजपुरवठा बंद आहे. इंदापूर नगरपालिकेची मिळकतकराची रक्कम ६ लाख ८५ हजार थकवली आहे. कामगारांच्या तीन महिन्यांचे पगार झाले नाहीत. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्यात आली नाही. या संदर्भात दूधगंगा संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, की दूधगंगा संघ पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संघ बंद नाही. आर्थिक स्थिती बिकट असली तरी मार्ग काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. कामगारांचे पगार थकले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक मंदीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारही महिनोनमहिने होत नाहीत. दूधगंगाच्या कामगारांचेही पगार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.