शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

दूध दराला फुटणार उकळी

By admin | Updated: May 18, 2015 04:39 IST

: मुंबईकरांना दूध पुरवठा करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत लीटरमागे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे

मुंबई : मुंबईकरांना दूध पुरवठा करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत लीटरमागे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. दूध विक्रेत्यांनी कमिशनवाढीची मागणी केल्याने दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याआधी कमिशनवाढ करण्यास नकार देणाऱ्या दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी गोकुळ, महानंद, मदर डेअरी, वारणा आणि अमुलच्या दूध विक्रीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र बहिष्कारानंतर झालेल्या चर्चेत महानंदने लीटरमागे २ रुपये व गोकुळने १ रुपयाच्या दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे विक्रेत्यांच्या कमिशनमध्येही वाढ झाली. मात्र वारणा, अमुल आणि मदर डेअरी कंपन्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केली नसल्याने मंगळवारपासून त्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार टाकणार असल्याचे अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाचे जगदीश कट्टीमणी यांनी सांगितले.कट्टीमणी म्हणाले, महानंदने कमिशनवाढ केली असून गोकुळने तशी घोषणा केली आहे. मात्र अन्य तीन कंपन्यांकडून अद्याप ठोस आश्वासन मिळालेले नाही. ३६५ दिवस ग्राहकांची सेवा करणाऱ्या विक्रेत्यांची कोणत्याही कंपनीच्या दफ्तरी नोंद नाही. तुटपूंज्या कमिशनवर काम करणे परवडत नसल्याने विक्रेते एमआरपीहून अधिक किंमतीने दूध विक्री करत होते. ग्राहकही कोणतीही तक्रार न करता अधिक पैसे देत होते. मात्र वैध मापन शास्त्र विभागाने सुरू केलेल्या कारवाईने विक्रेत्यांना आता अधिकृतपणे कमिशन हवे आहे. त्यासाठी कंपन्यांकडेही ठराविक टक्के कमिशनची मागणी केली.त्यातल्या त्यात महानंद आणि गोकुळने प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अमुल, वारणा आणि मदर डेअरी च्या दुधाची विक्री बंद करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)