शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मायेच्या दुधाची बँक

By admin | Updated: March 6, 2017 23:25 IST

माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात

सुमेध वाघमारे नागपूर, दि. 6 : माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. नवजात अर्भक अमृतासमान असलेले आईच्या दुधापासून वंचित राहतात, तर काही कारणांमध्ये आई अंगावर बाळाला पाजू शकत नाही. अशांना वरचे दूध द्यावे लागते. पण या वरच्या दुधात आवश्यक ती संरक्षक द्रव्ये राहात नाही. यामुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ मंदावते़ यावर उपाय म्हणून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेयो) मानवी दुग्ध पेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा आईच्या दुधापासून परके झालेल्या नवजात शिशूंना मिळणार आहे.

विशेष म्हणजे, अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने निर्दयी माता निष्पाप जीवाला उकिरड्यावर सोडून पळ काढतात़ अशा निराधार मुलांची रवानगी मग अनाथालयात होते. अशा चिमुकल्यांचे योग्यरीत्या पपोषण होण्यासाठी मानवी दुग्ध पेढीह्णची मागणी गेल्या काही वर्षांपासून अनाथालयाकडून वाढली होती.

आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचे दूध म्हणून गाई-म्हशीचे दूध नाही तर पावडरचे दूध दिले जाते. मात्र आईच्या दुधात असणारी संरक्षक द्रव्ये या दुधात नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही अत्यंत अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतूसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडतात. अशा बाळांसाठी १९८९ साली डॉ. अल्मिडा यांनी आशिया खंडातील पहिली मातृ दुग्ध पेढी स्थापन केली. यात माता आपल्याकडचं जास्तीचे दूध दान करते.

-अशी राहणार मिल्क बँक बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेपक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या दुधाचा उपयोग अपुऱ्या दिवसांच्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बाळासाठी होतो. शिवाय ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळाला पाजण्यासाठी अजिबातच दूध येत नाही त्यांना किंवा आईने सोडून दिलेल्या बाळासाठी मातृ दुग्ध पेढीतील दुधाचा उपयोग होऊ शकतो.

-पेढीतील दूध बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षितआईच्या दुधाएवढेच हे दूध सुरक्षित असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या मते, बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीचे दूध साठवून ठेवले जाते. दूध हे शास्त्रोक्त पद्धतीने साठवले जाते. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टील कंटेनरमध्ये सर्वात आधी थोडे म्हणजे साधारण पाच मिलीलिटर दूध काढून घेतले जाते. मग हे दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून जास्त दूध घेतले जाते. दुधाचे कल्चर केले जाते. या प्रक्रि येमुळे दूध स्तनपानाच्या दुधाइतकेच चांगले आणि पौष्टिक राहते.-मातृ दुग्ध पेढीचा पर्याय योग्यआईचे दूध उपलब्ध होऊ न शकणाऱ्या बाळांसाठी मातृ दुग्ध पेढीचा पर्याय योग्य आहे. बाळाला पहिले चीक दूध पाजलेच पाहिजे; पण कधी कधी दुर्दैवाने आईचे दूध बाळाला देता येत नाही. तेव्हा पर्याय उरतो तो या पेढीचा. सायन हॉस्पिटलनंतर आता कामा, केईएम, जे.जे. हॉस्पिटल व आता अमरावतीच्या शासकीय रुग्णालयामध्येही या पेढीला सुरु वात झाली आहे. मेयोत ही पेढी सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) व इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्स यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात रोटरी क्लबचीही मदत घेतली जाणार आहे. -डॉ. दीप्ती जैनविभागप्रमुख, बालरोग विभाग, मेयो