शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला

By admin | Updated: April 10, 2015 04:23 IST

एका मोटारसायकलवर तिघांना येत असल्याचे पाहून एका हवालदाराने अडवले. त्याचा राग येऊन त्याच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याची घटना

शहापूर : एका मोटारसायकलवर तिघांना येत असल्याचे पाहून एका हवालदाराने अडवले. त्याचा राग येऊन त्याच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याची घटना गोठेघर येथे घडली. पोलीस हवालदार प्रशांत वाघ (३९) यांच्यावर शहापूर-किन्हवली रस्त्यावरील गोठेघर येथे आठ जणांच्या टोळक्याने गुप्ती, चॉपरने जीवघेणा हल्ला केला. किन्हवली मार्गाने येणाऱ्या विनापरवाना वाहनांची तपासणी सुरू असतानाच एका मोटारसायकलवर तिघांना येताना पाहून हवालदार वाघ यांनी त्यांना अडविले. याचा राग येऊन त्या मुलांनी फोन करून इतर पाच जणांना बोलवले. या आठही जणांनी वाघ यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. वाघ यांच्या मदतीसाठी दोन पोलीस धावून आले, मात्र त्यांनाही न जुमानता हे हल्लेखोर पोलिसांसमोरून सहज निघून गेले.पोलिसावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध याआधीदेखील दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय, राज्य गुप्तचर विभागाच्या शोधक्रमवारीतही त्यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सुनील लकडे, जयेश फरडे, अनिल कांबळे, प्रीत, संदीप वाळींबे, मनोज लकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांची नावे कळू शकली नाहीत. हल्लेखोरांच्या तपासासाठी पथक रवाना झाले असून मुंबई-नाशिक महामार्ग व वाडा, मुरबाड तालुक्यांच्या सीमा तपासणी नाक्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. वाघ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(प्रतिनिधी)