शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद पाटणकर भाजपाचे गटनेते

By admin | Updated: February 28, 2017 03:12 IST

भाजपाचे वादग्रस्त राहिलेले आणि ज्यांच्यावर पक्षातीलच काही नगरसेवकांनी अविश्वास दाखवला होता

ठाणे : भाजपाचे वादग्रस्त राहिलेले आणि ज्यांच्यावर पक्षातीलच काही नगरसेवकांनी अविश्वास दाखवला होता, ते ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यावर आता वरिष्ठांनीच विश्वास दाखवला आहे. त्यांच्या गळ्यात भाजपाच्या गटनेतेपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भातील पत्रदेखील भाजपाच्या गटाने सोमवारी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. त्यानुसार, आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजपाला २३ जागा मिळाल्या असून पाटणकर यांनी आपल्या प्रभागातील अख्खे पॅनल निवडून आणले आहे. २०१२ नंतर ठाणे परिवहन सेवेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळेस घडलेल्या राजकीय नाट्याचे ते बळी ठरले होते. या वेळेस युती उमेदवारांच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले होते. त्यानंतर, त्यांना स्वपक्षातील नगरसेवकांनी आणलेल्या दबावाला बळी पडून उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवस ते भूमिगतही झाले होते. पक्षातील एका गटाकडून अविश्वास आणून त्यांना शहराध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागले होते. एवढे घडून गेल्यानंतर आता श्रेष्ठींनीच त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. (प्रतिनिधी)