शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव स्फोटाची कागदपत्रे गहाळ!

By admin | Updated: April 8, 2016 02:47 IST

मालेगावमध्ये मध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटातील महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविले गेलेले अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतील असे जबाब विशेष

मुंबई : मालेगावमध्ये मध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटातील महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविले गेलेले अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतील असे जबाब विशेष न्यायालयातून गहाळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित झाला असता सरकारने यावर निवेदन करावे, असे निर्देश तालिका अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिले.२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावच्या भिक्कू चौकात दोन स्फोट झाले होते. यात सात लोकांचा मृत्यू तर ८० लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोध पथकाकडे असताना त्यांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि भारतीय लष्कराचा अधिकारी लेफ्टनंट श्रीकांत पुरोहित यांचा समावेश होता. ते दोघेही ‘अभिनव भारत’ या हिंदू मुलतत्ववादी संघटनेसाठी काम करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. २०११ मध्ये या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आला. या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब असलेली कागदपत्रे गहाळ झाली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिल्याने खळबळ उडाली आहे. कागदपत्रे न्यायालयातून गहाळ असल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकारने निवेदन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गटनेते जयंत पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)