शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलनावर ‘मिक्ता’चे सावट!

By admin | Updated: February 11, 2016 03:59 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ठाण्यात होणाऱ्या ९६व्या नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवून काही कलावंतांना आॅस्टे्रलियात होणाऱ्या ‘मिक्ता’ सोहळ्याचे वेध लागले आहेत.

- महेंद्र सुके, ठाणेअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ठाण्यात होणाऱ्या ९६व्या नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवून काही कलावंतांना आॅस्टे्रलियात होणाऱ्या ‘मिक्ता’ सोहळ्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनातील ग्लॅमर हरवण्याची चिंता आयोजकांना लागली आहे. अखिल भारतीय नाट्यसंमेलन १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तर, २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मिक्ता (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अवॉर्ड्स) सोहळा आॅस्ट्रेलियात होणार आहे. मिक्ताच्या आयोजकांपैकी काही कलावंतांची टीम या सोहळ्याच्या तयारीसाठी आधीच आॅस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर कलावंत रवाना होणार आहेत. नाट्य-सिनेकलावंतांसाठी हे दोन्ही सोहळे महत्त्वाचे असतात. त्यामुळे या दोन्हीच्या तारखा ओव्हरलॅप होऊ नयेत, याविषयी समन्वयाची गरज होती. मात्र, ते झाले नसल्याचेच आता उघड झाले आहे. बुधवारी ठाण्यात नाट्यसंमेलनातील कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोजकांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आयोजन समितीतील एका सदस्याने सांगितले की, ‘मिक्ता’मुळे या संमेलनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे काही कलावंतांनी कळविले आहे.विशेषकरून आम्हाला काही ‘आर्टिस्ट’ पाहिजे होते, ते मिळू शकले नाहीत. ज्येष्ठ सिनेनाट्य दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी यांचे एका परिसंवादात असणे गरजेचे होते; पण ते ‘मिक्ता’मुळे त्या परिसंवादात नसतील, अशी खंत व्यक्त करण्यात आली.परदेशात सोहळा असल्याने आयोजकांपैकी काही कलावंतांना तिथली व्यवस्था करण्यासाठी आधी जावे लागणार आहे. दोनशे-अडीचशे कलावंतांची परदेशात नीट व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांवर असते, ते समजून घ्या. संमेलनावर कुरघोडी करण्याचा आमचा उद्देश नाही. फार आधी हा सोहळा निश्चित झाला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींपासून आम्ही सारेच एकत्र काम करणारे आहोत. - चंद्रकांत कुलकर्णी, सिने-नाट्य दिग्दर्शक