शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिखाईललाही ठार मारायचे होते, पण...

By admin | Updated: September 1, 2015 02:31 IST

शीना बोराला विक्रोळीजवळ कारमध्ये ठार मारल्यानंतर आम्ही त्याच कारमधून मिखाईलला आणून ठार मारण्यासाठी पुन्हा वरळीला निघालो होतो, अशी माहिती संजीव खन्ना याने

डिप्पी वांकाणी, मुंबई शीना बोराला विक्रोळीजवळ कारमध्ये ठार मारल्यानंतर आम्ही त्याच कारमधून मिखाईलला आणून ठार मारण्यासाठी पुन्हा वरळीला निघालो होतो, अशी माहिती संजीव खन्ना याने पोलिसांना दिली. मिखाईलला त्यांनी शीतपेयातून नशेचे पदार्थ दिले होते. पण परत आले तेव्हा मिखाईल तेथे त्यांना दिसला नाही; तेव्हा त्यांना धक्का बसला होता.डेहराडूनमध्ये शीनाचा राहुलशी साखरपुडा झाला तेव्हापासून इंद्राणीने तिला ठार मारण्याची योजना आखायला सुरवात केली होती. कारण पीटर मुखर्जीचा राहुल हा कायदेशीर वारस होता व त्यामुळे शीना अधिक वरचढ बनली असती व ही बाब शीनाचा द्वेष करणाऱ्या इंद्राणीला सहन झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. इंद्राणी व संजीव खन्ना यांनी शीना आणि मिखाईल यांना त्याच रात्री एकामागोमाग एक असे ठार मारायचे ठरविले होते. यासाठी त्यांनी दोन सुटकेसेसही विकत आणल्या होत्या. वरळीच्या घरी त्यांनी मिखाईलला अमलीपदार्थ खाऊ घातले होते. शीनाला ठार मारल्यानंतर ते मिखाईलला घेऊन येण्यासाठी त्याच मार्गाने परत आले होते. त्यालाही ते गळा दाबून ठार मारणार होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर मिखाईलने नोकरी सोडली होती आणि तो इंद्राणीकडे दरमहा खूप पैसे मागू लागला होता. त्यामुळे त्यालाही ठार मारण्यात येणार होते. राहुल आणि शीना यांच्या संबंधांना पीटर व इंद्राणी यांची मान्यता नव्हती तरीही त्या दोघांनी साखरपुडा केला. मात्र या समारंभाला पीटर व इंद्राणी दोघेही उपस्थित नव्हते.पीटरला राहुल आणि रॉबिन ही दोन मुले असल्यामुळे त्याच्या मालमत्तेचे ते कायदेशीर वारस होते. शीनाचा कमालीचा द्वेष करणाऱ्या इंद्राणीला राहुलच्या माध्यमातून का असेना पीटरच्या मालमत्तेमध्ये वाटेकरी होणार, हे सहन झाले नाही. त्याच सुमारास मिखाईलही इंद्राणीला मी तुझा भाऊ आहे मुलगा नाही, हे रहस्य उघड न करण्यासाठी सतत भरपूर पैसे मागायचा. मिखाईल विमान कंपनीत नोकरीस होता ती त्याने सोडून दिली होती. त्यानंतर तो इंद्राणीवर अवलंबून राहिला. या कारणांमुळेच तो इंद्राणीच्या हिटलिस्टवर आला होता, असे या सूत्रांनी सांगितले.पीटर मुखर्जीकडे ब्रिटिश पासपोर्ट होता व तो भारतात केवळ भेट देण्यास यायचा, असे पोलिसांनी सांगितले. पीटर व इंद्राणी हे जोडपे त्यांचा बहुतेक काळ लंडनमध्ये घालवायचे. इंद्राणीने ठार मारण्यासाठी अडीच लाख रुपये देऊन एकाला सुपारी दिली होती. परंतु ते काम तो करू शकला नाही. मात्र या प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा पोलिसांनी इन्कार केला. आम्ही आतापर्यंत केलेली चौकशी कोणत्याही मारेकऱ्यापर्यंत गेलेली नाही, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.