शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या भीतीने तेलंगणमध्ये स्थलांतर

By admin | Updated: March 31, 2016 01:47 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यात एका गावातील २३ कुटुंबांनी नापिकी व जादूटोण्याच्या भीतीने तेलंगण राज्यात स्थलांतर केले आहे. यामुळे संपूर्ण गाव

- फारूख शेख, पाटण (चंद्रपूर)चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यात एका गावातील २३ कुटुंबांनी नापिकी व जादूटोण्याच्या भीतीने तेलंगण राज्यात स्थलांतर केले आहे. यामुळे संपूर्ण गाव ओसाड झाले आहे.ही कुटुंबे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून भाईपठार कोलामगुडा येथे राहत होती. गेल्या पाच वर्षांपासून नापिकीमुळे हातात काहीही उत्पन्न येत नाही आणि दुसरीकडे सावकाराचे कर्ज वाढत चालले होते. यामुळे ही कुटुंबे त्रस्त होती. याशिवाय गावात एकापाठोपाठ तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. हे गावावर कोणीतरी जादूटोणा करीत आहे व यामुळेच शेतीतही चांगले पीक येणे अवघड झाले आहे, अशी धारणा गावकऱ्यांची झाली.आणखी काही तरी वाईट होईल, या भीतीने गावातील २३ कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती या कुटुंबांपैकी एक असलेल्या भीमू जलपती कुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तथापि, या गावकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेकडून सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्य डॉ. पंकज पवार यांनी कुमरे यांची भेट घेऊन या २३ कुटुंबांना गावात परत आणण्यासाठी शासनातर्फे पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.- या सर्व कुटुंबांना शासनातर्फे घरकुल मिळाले आहे. पण ती आता ओस पडली आहेत. गावात सिमेंटचे रस्ते, विद्युतपुरवठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप आहे. असे असतानाही गावात मात्र नागरिक वास्तव्यास नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.