शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपो स्थलांतरित करा

By admin | Updated: September 24, 2016 01:08 IST

कचरा आसपास पसरून त्याच्या दुर्गंधीने आसपासच्या बंधनगड, चेरीबेरी, हरिओम पुरम्, सँडलवूड, अमेय आदी सोसायट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला

औंध : सर्व्हे नं. २४४/१ मध्ये नवीन डीपी रोडवरील देवीच्या मंदिरासमोर असलेल्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नसल्याने हा कचरा आसपास पसरून त्याच्या दुर्गंधीने आसपासच्या बंधनगड, चेरीबेरी, हरिओम पुरम्, सँडलवूड, अमेय आदी सोसायट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या कचरा डेपोच्या पुढेच काही फुटांवरच खासगी प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र असल्यामुळे यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या दोन्ही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा कचरा डेपो येथून तातडीने हलवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. स्वच्छ या कचरा-सेवक स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी वस्त्यांमधून कचरा गोळा करून या ठिकाणी गोळा करतात. नंतर हा कचरा कंटेनरच्या साह्याने डम्पिंग यार्डमध्ये पाठविला जातो; मात्र हे वर्गीकरण रोज वेळच्या वेळी होत नसल्यामुळे हा कचरा रस्त्यावर पसरलेला दिसतो. दुसरी बाब म्हणजे, या कचरा डेपोच्या पुढेच काही फुटांवर खासगी प्लॅस्टिक संकलन केंद्र असून त्या केंद्रातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिकच्या वस्तू भरलेली पोती रस्त्याच्या शेजारीच लावून ठेवलेली दिसतात. त्यामुळे हा संपूर्ण परिसर कचरामय झाल्याचे वाईट चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)>कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना घरात राहणे कठीण झाले आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय प्रवास करता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. कचऱ्यामुळे घराघरांत माश्या, डास वाढले आहेत.