शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मध्यरात्री अश्रुंचा बांध फुटला

By admin | Updated: February 21, 2015 02:11 IST

अण्णांच्या संघर्षाची अखेर : निधनाचे वृत्त समजताच कोल्हापूरवासियांना जबर धक्का

विश्वास पाटील - कोल्हापूर -- ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे उर्फ कोल्हापूरचे ‘अण्णा’ यांचे निधन झाल्यावर मध्यरात्रीही कोल्हापूरला हुंदका अनावर झाला. पानसरे अण्णांनी प्रत्येकाला लढायला शिकवले, रडायला नाही. परंतु तुमच्या आठवणींनी हुंदका आवरणे कठीण असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी तर हंबरडाच फोडला.आज, शुक्रवारी दुपारपासूनच कोल्हापुरात पानसरे अण्णांना मुंबईला हलविणार असल्याची बातमी प्रत्येकाच्या तोंडात होती. ती ऐकून अण्णा कसे आहेत हो अशी विचारणा लोक आस्थेनेच करत होते. दुपारी त्यांना मुंबईला हलविल्यावर आता त्यांच्यावर चांगले उपचार होतील व अण्णा परत येतील असेच प्रत्येकाला वाटत होते. कारण लढाऊ बाणा हेच अण्णांचे जीवन होते. त्यामुळे मृत्यूलाही ते सहजासहजी शरण जाणार नाहीत. ते या हल्ल्यातून वाचावेत व एकदा त्यांचे खणखणीत भाषण ऐकायला मिळावे अशी सर्वांचीच इच्छा होती; परंतु नियतीने ती कायमचीच अपुरी ठेवली. रात्री अकरानंतर सोशल मीडियासह मोबाईलवर दबक्या आवाजात पानसरे यांच्या मृत्यूच्या बातमीची चाहूल सुरू झाली. ती खात्री करून अनेकांनी अफवा असल्याचे जाहीर केले. कित्येकांनी तर अण्णांना माझे आयुष्य लाभो असे देवाला साकडे घातले. परंतु देव तरी किती निष्ठुर, त्याने कुणाचेच ऐकले नाही. त्याला जे करायचे होते तेच केले आणि अण्णांची इहलोकीची यात्रा संपवली.मध्यरात्रीची वेळ असूनही दसरा चौक, बिंदू चौक, कम्युनिस्ट पक्षाच्या आॅफिससमोर तसेच लक्ष्मीपुरीतही लोकांची चौकाचौकांत गर्दी झाली. प्रत्येकजण पानसरे यांच्या आठवणी सांगत होते. निधनाबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मारेकरी अजून मोकाट असल्याने त्याबद्दलही संताप व्यक्त होत होता. रात्र असल्याने सगळ््यांनाच घराबाहेर पडता आले नाही. म्हणून दु:खाचा हुंदका त्यामुळे थांबला नाही. रात्रीचा अंधारही त्या हुंदक्याने गदगदून गेला. पानसरे अण्णा नाहीत, तर या जगावरील अंधारही तसाच कायम राहावा, अशी वेदनेची सलही त्यातून भेदून गेली. कुणाचे कोण असलेल्या, मध्यरात्री रस्त्यावर उभे राहून देहविक्री करणाऱ्या महिलांच्या डोळ््यांतही निधनाचे वृत्त ऐकून अश्रू तरळले. बिंदू चौक, शाहू स्मारकपासून ते बँक, तहसीलदार कार्यालय, श्रमिक कार्यालयापासून ते शिवाजी विद्यापीठापर्यंत कोल्हापुरात अशी एकही जागा नाही की जिथे पानसरे अण्णा कधी ना कधी जाऊन बोललेले नाहीत, प्रश्न मांडलेला नाही. या सगळ््या निर्जीव जागाही पानसरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून क्षणभर थबकल्या. दुर्देवी योगायोग !पुणे येथे अज्ञात हल्लेखोरांनी २० आॅगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मारेकऱ्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. त्यातच पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार झाला. पाच दिवसापासून मृत्यूशी झूंज देणारे पानसरे यांची प्राणज्योत २० तारखेलाच मालवली. २० तारखेचा हा दुर्देवी योगायोग पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला यावा हे वाईटच...पानसरे यांच्या घरासमोर नीरव शांतताज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सागरमाळ परिसरातील त्यांच्या घराशेजारीच हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असणाऱ्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या पाच दिवसांपासून या दाम्पत्यावर या ठिकाणी उपचार सुरू होते. तेव्हापासून त्यांची सून, नातू, मुली असे कुटुंबीय हॉस्पिटलमध्येच होते. शुक्रवारी सायंकाळी पानसरे यांना मुंबईतील ब्रीच कॅँडी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यासोबत सुन मेघा पानसरे होत्या. या ठिकाणी रात्री उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे उर्वरित कुटुंब ‘आधार’मध्येच आहे. पानसरे यांचे निधन झाल्यानंतर मध्यरात्री पाऊण वाजता त्यांच्या घरासमोर नीरव शांतता होती. बंदोबस्ताला असलेले पोलीस झोपलेले होते. लुंगी व बनियनवर फिरायला बाहेर पडलेले अण्णा अखेर घरी परतलेच नाहीत.