शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

By admin | Updated: May 16, 2016 01:47 IST

समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही

देहूरोड : समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही. उलट देशातील बहुसंख्य लोक मध्यमवर्गीय बनू लागले आहेत. आजचा मध्यमवर्गीय हा अत्यंत दुबळा, विचारहीन आणि संवेदनाहीन असून, जाती निर्मूलनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांपासून खूप दूर चालला आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी व कामगार नेते काशिनाथ सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘एकच ध्यास धम्मभूमी देहूरोडचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन हभप रामदासमहाराज यांचे हस्ते झाले. त्या वेळी वैद्य बोलत होते. भन्ते राजरतन , पशुराम वाडेकर, दादासाहेब सोनवणे, मिलिंद भालेराव, कवी प्रा. बाबासाहेब जाधव, आकाश सोनवणे, आर. के. लोंढे, सी. डी. धस आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, डॉ आंबेडकर यांना हा देश जातीविरहित देश बनवायचा होता. त्यांनी जाती निर्मूलनासाठी लढणारी एक फळी तयार केली होती. वाघासारखी डरकाळी फोडून जाती व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या फळीने करावे, असे त्यांचे स्वप्न होते. पण, दुर्दैवाने ज्यांनी हे करायचे होते, तेच आता जातीयवाद्यांच्या पुढ्यात बसले आहेत. घटनेच्या प्रास्ताविकेतील काही शब्द बदलले जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले, तर एक दिवस संपूर्ण घटनाच बदली होईल. घटनेची रक्षण करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शब्दांप्रमाणे जातीविरहित हा शब्द घालण्याची गरज आहे. ह.भ.प. रामदासमहाराज म्हणाले, माणूस हा मानवतावाद सोडून अंधश्रद्धेमागे धावत आहे. (वार्ताहर)