शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: April 29, 2016 03:58 IST

आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे.

ठाणे : रेती-खाण माफिया, बेकायदा गोदाम मालकांची लॉबी यांच्या डोळ्यात सलत असलेल्या आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे. जोशी यांच्या बदलीमुळे स्वच्छ प्रशासनाचे वायदे करणाऱ्या राज्यातील भाजपाप्रणीत सरकारचेच नाक कापले गेल्याची भावना ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.जिल्ह्याला तब्बल ३१ वर्षांनंतर डॉ. अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून महिला जिल्हाधिकारी लाभल्या होत्या. शिवाय त्या आयएएस दर्जाच्या अधिकारी होत्या. अन्यथा ठाण्यात प्रमोटी आयएएस जिल्हाधिकारीपदी धाडण्याची जुनी प्रथा होती.जोशी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र वेगवेगळ््या लॉबींनी आणि त्यांना आशीर्वाद असलेल्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींनी बदलीकरिता रेटा लावल्याने अखेर मुंबईचे जिल्हाधिकारी हे तोलामोलाचे पद देऊन त्यांची घाऊक बदल्यांमध्ये उचलबांगडी केली गेली. भाईंदरमधील सेंट्रल पार्क चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ती जागा सरकारी असल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हाधिकारी जोशी यांनी याबाबत नोटीस बजावल्या. तसेच पार्कच्या कामाला स्थगिती दिली. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य केले होते. करमणूक कर भरण्याच्या प्रकरणावरून कल्याणचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि जिल्हाधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगला. तेही सध्या भाजपाच्या कळपात आहेत. ठाणे, कल्याण, भाईंदर रेतीबंदर परिसरातील अवैध रेती उपासा करणाऱ्या माफियांविरोधातही जोशींनी कारवाई केली होती. नवी मुंबईतील दगड खाणी सील करण्याची कारवाई यापूर्वी केली. जोशी यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वनराई बंधारे उभारले. तसेच टाऊन हॉलला नवीन झळाळी प्राप्त करून दिली. (प्रतिनिधी)